Ads Area

Khadakwasla Dam in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; खडकवासला धरणाचे दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. खडकवासला (Khadakwasla Dam) हे धरण तुडुंब भरले असून  या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.  सकाळी साडेसहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाकडून नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये (Mutha River) सुरू असणारा 200क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 06:30 वा. 4708 क्युसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, असे खडकवासला पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात काल रात्रीच सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी खडकवासला धरण 95 टक्के भरले होते.  खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे (Pune Rain) सकाळी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. खडकवासला धरण जुलै महिन्यातच भरल्याने पुणेकरांची पाण्याची चिंता जवळपास मिटल्यात जमा आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल.

अर्धा तासात खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गाचा वेग वाढवला

खडकवासला धरणाचे दरवाजे सकाळी साडेसहा वाजता उघडण्यात आले तेव्हा मुठा नदीत 4708 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्र, काहीवेळातच पाण्याच्या विसर्गाचा वेग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 4708क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 07:00 वा. 9416 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी.तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

खडकवासला पाटबंधारे विभागाकडून मंगळवारी रात्री प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले होते की, आपणास सूचित करण्यात येत आहे की आज दिनांक 24 जुलै 2024 रोजी  खडकवासला धरण 95% टक्के क्षमतेने भरले आहे.पाऊस चालू/वाढत  राहिल्यास  परिस्थितीनुसार  खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये पुढील 4 ते 5 तासात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.तरी या द्वारे विनंती करण्यात येते की पुणे महानगर पालिका व पोलीस प्रशासन यांनी योग्य ती दक्षता घ्यावी.

तसेच सर्व नागरिकांना याद्वारे सतर्क करण्यात येते की कृपया नदी पात्रात कोणीही उतरू नये आणि पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या काल रात्री प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले होते.

आणखी वाचा

पालकांनो 'या' शाळांमध्ये ॲडमिशन घेऊ नका; पुण्यातील 49 अनधिकृत शाळांपैकी 13 शाळा बंद

दिलासादायक! शहराची पाण्याची चिंता मिटली; खडकवासला धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढला, वाचा आजची आकडेवारी

from Narendra Modi budget अर्थ बजेटचा, बिहार लाडका, महाराष्ट्र परका? https://ift.tt/av9CNzh

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area