Ads Area

रविकांत तुपकर यांची 'स्वाभिमानी'तून हकालपट्टी; ट्वीट करत म्हणाले, ''मी तुला आतून बाहेरून ओळखतो…'', आता पुढची भूमिका काय?

Ravikant Tupkar Was Expelled From Swabhimani Farmers Sanghatna : बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून (Swabhimani Farmers Sanghatna) हाकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याबद्दल रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सांगण्यात आलं. दरम्यान, संघटनेच्या या निर्णयानंतर रविकांत तुपकर यांनी एक ट्वीट केलं. सध्या हे ट्वीट राजकीय वर्तुळात चर्चेता विषय ठरत आहे.

मी तुला आतून बाहेरून ओळखतो; रविकांत तुपकर यांचं ट्वीट चर्चेत

रविकांत तुपकर पक्षनेतृत्त्वावर टीका करत असून आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि त्यांचा आता काहीही संबंध राहणार नसल्यचं संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी सांगितलं आहे. रविकांत तुपकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. "संक्रमण होणार त्याची खूण ओळखतो, पावसाला अन् उन्हाला जून ओळखतो. माहिती आहे मला पुढची तुझी खेळी, मी तुला आतून बाहेरून ओळखतो...", असं ट्वीट रविकांत तुपकर यांनी केलं आहे. तसेच, त्याखाली त्यांनी त्यासोबतच त्यांनी सुरेश भट यांची विझलो जरी आज मी… या कवितेच्या ओळी पोस्ट केल्या आहेत. रविकांत तुपकर यांच्या सूचक ट्वीटनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्त पालन समितीची बैठक सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ज्येष्ठ नेते सतीष काकडे, विठ्ठल मोरे, मिलिंद साखरपे, अनिल पवार आदींसह जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत तुपकर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. यापुढे तुपकर यांचा स्वाभिमानी पक्ष आणि संघटनेशी कोणताही संबंध असणार नाही, असंही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी जाहीर केलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले की, "स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तुपकर यांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद दिलं. संघटनेच्या वतीनं राज्यमंत्री पदाच्या दर्जाचं महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पद दिले. तरीही तुपकर संघटनेच्या विरोधात काम करत राहिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुपकर यांनी 26 सप्टेंबर 2019 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा दिला होता. त्यानंतरही तुपकर यांच्या मागणीनंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात सक्रिय होते."

तुपकर सातत्यानं पक्ष विरोधी कृत्ये करताहेत : जालिंदर पाटील

"लोकसभा निवडणूक तुपकर यांनी पक्षाच्या वतीनं लढवणं अपेक्षित होतं, तरीही ते अपक्ष म्हणून लढले. तरीही स्वाभिमानीचा एक कार्यकर्ते म्हणून शेट्टी यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतरही तुपकर यांनी शेट्टी यांच्यावर टीका करणं सुरूच ठेवलं होतं. ते मागील तीन ऊस परिषदेसह अन्य कोणत्याही कार्यक्रमला उपस्थिती राहिलेले नाहीत. तुपकर सातत्यानं पक्ष विरोधी कृत्ये करत आहेत. राजू शेट्टी यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. त्यामुळे शिस्त पालन समितीसमोर उपस्थितीत राहून आपलं म्हणणं मांडण्याची नोटीस काढली होती. पण, ते शिस्त पालन समितीसमोर हजर राहिले नाहीत. त्यांनी परस्पर विधानसभेला विदर्भातील सहा जागा लढविण्याची घोषणादेखील केली.", स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले.

रविकांत स्वाभिमानी शेतकरी संघटना काबीज करण्याचा प्रयत्न करतायत : जालिंदर पाटील

"आता ते स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पक्ष आणि संघटनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे. यापुढे तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही", असं जालिंदर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

from Shambhuraj Desai : विधानपरिषदेत मविआची 10-15 मतं महायुतीकडे आली आहेत https://ift.tt/RJT1O9w

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area