Ads Area

Sindhudurga News: कोकणातले राजकीय वैऱ्यांची दिलजमाई! राजकीय दहशतवादी म्हणून ज्यांना हिणवलं, ते राणे आता केसरकरांसाठी देव

Maharashtra Sindhudurga News: सिंधुदुर्ग : राजकारणात (Maharashtra Political Updates) कोण केव्हा कोणत्या पक्षात जाईल, कोणासोबत आपल्या फायद्याासाठी जुळवून घेईल याचा नेम नाही. असाच काहीसा प्रत्यय सिंधुदुर्गच्या (Sindhudurga Politics) राजकारणात आला आहे. 2014 मध्ये नारायण राणे (Narayan Rane) आणि दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे राजकीय विरोधक होते. मात्र, आता दोघेही एकमेकांशी जुळवून घेऊन आपण राजकीय वैरी केव्हाही नव्हतो, असं म्हणत आहेत. एवढंच काय तर, सावंतवाडीत दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे कोकणवासीयांचा देव असल्याचं म्हटलं आहे.

2014 राष्ट्रवादी काँगेसमधून (NCP) शिवसेनेत (Shiv Sena) आलेले दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या विरोधात सिंधुदुर्गात (Sindhudurga) रान पेटवलं होतं. "अशा लाल भूमीत जन्मास यावं, जिचा रंग रक्तास दे चेतना, इथे नांदते संस्कृती भारताची, घरादारांत वृंदावन" अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत दीपक केसरकर यांनी लाल मातीत लाल रक्त सांडून राणे दहशतवाद निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप राणेंवर केला होता. राणेंवर दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप करत केसरकरांनी राजकीय रान पेटवलं होतं. त्याचाच फटका म्हणून नारायण राणेंना 2014 च्या विधानसभेत पराभव पत्करावा लागला होता. मात्र तब्बल 10 वर्षांनी ज्यांना दहशतवाद पसरवण्याचा आरोप केलेल्या दीपक केसरकरांनी राणेंना देव म्हटलं आहे. त्यामुळेच राजकारणात कोणी कुणाचं कायमचं वैरी नसतं, हे कोकणात दिसून आलं.

दीपक केसरकर आता राणे आणि आपली विचारिक लढाई होती, असं म्हणत आहेत. मात्र याच दीपक केसरकरांना राणेंवर टीका केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी मंत्रीपद दिल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदासाठी कोट्यावधी रुपयांची मागणी केल्याचा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला असून आपण एक कोटींचा चेक दिल्याचं म्हटलं आहे. मंत्रिपद देण्यासाठी उद्धव ठाकरे पैसे घ्यायचे, या केसरकरांच्या वक्तव्याला भाजप आमदार नितेश राणेंनी देखील दुजोरा दिला आहे.

कोकणात निवडणुका जसजशा जवळ येतात, तसतसं राजकीय वातावरण नेहमी तापलेल असतं. मात्र आता गेल्या 10 वर्षांत पुलाखालून बरंच पाणी गेलं असल्यानं आताची राजकीय परिस्थिती बदलेली आहे. एकेकाळी राणेंच्या विरोधात सर्वच राजकीय पक्ष एकत्र यायचे मात्र आता राणे, केसरकर एकत्र आले असून ठाकरेंची शिवसेना यांच्यात राजकीय संघर्ष आगामी काळात दिसेल. मात्र राजकारणात केव्हाही काही होऊ शकतं, याचा प्रत्यय सिंधुदुर्गातील जनतेला आला आहे.

दीपक केसरकर आणि राणे यांच्यामधला वाद तब्बल 12 वर्षांनंतर संपला. दीपक केसरकर स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी जात आपण केव्हा राजकीय विरोधक नव्हतो, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र हे सर्व आगामी लोकसभा निवडणुकीची एक बेगमी असल्याचं बोललं जात आहे. कारण दीपक केसरकर हे एक राजकीय मुसद्दी नेते आहेत. ते आपल्या राजकीय फायद्यासाठी तीन वेगवेगळ्या पक्षात गेले असून आगामी निवडणूक भाजपमधून लढवतील, असा गौप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

from Chhagan Bhujbal vs Manoj Jarange : भुजबळांना आलेल्या धमकीच्या पत्रावर जरांगे विरुद्ध भुजबळ https://ift.tt/xFtbCQv

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area