Samriddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर (<a href="https://ift.tt/5C0aEHy Highway) होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच असून, आज दुसऱ्या दिवशी संभाजीनगरच्या दौलताबादजवळल पुन्हा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (<a href="https://ift.tt/WretGSh) झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून, कारने अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, कारच्या समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे. राहुल आनंद निकम (वय 47 वर्ष, द्वारकानगर हडको), शिवाजी वामनराव थोरात (वय 58 वर्ष, द्वारकानगर) आणि अण्णा रामराव मालोदे (71 वर्ष, नवनजीवन कॉलनी, हडको एन-11) अशी मृतांची नावं असून, सर्व छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत. विशेष म्हणजे काल रात्रीच (शुक्रवारी) देखील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर अपघात झाला होता आणि त्यात देखील तिघांचा मृत्यू झाला होता.

समृद्धी महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी रात्री (शनिवारी) भीषण अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे. संभाजीनगर येथील प्रवासी कारने (एमएच 20 ईई 745) नाशिककडे जात होते. रात्री 11 च्या सुमारास दौलताबादजवळील माळीवाडा इंटरचेंजजवळ त्यांच्या कारने अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिली. ज्यात कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. तर कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री समृद्धी मार्गावरच वैजापूरजवळ तिघांचा कार अपघातात मृत्यू झाला होता आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा याच समृद्धी महामार्गावर तिघांनी आपला जीव गमवला आहे.

अपघाताची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली

शनिवारी रात्री झालेल्या अपघातातील मृत शिवाजी थोरात हे बजाज कंपनीतून काही दिवसांपूर्वी निवृत्त झाले होते. तसेच यातील दुसरे मृत अण्णा मालोदे हे शेतकरी असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा एक मुलगा पोलिस दलात आणि दुसरा मुलगा बँकेत नोकरी करतो. तसेच, मृत तर राहुल निकम हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली असून, मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

अपघातग्रस्त कार क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आली...

समृद्धी महामार्गावर दौलताबादजवळील माळीवाडा इंटरचेंजजवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ जखमींना मदत करण्यास सुरवात केली. मात्र, अपघात एवढा भीषण होता की, तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवत शासकीय घाटी रुग्णालयात पाठवले. तसेच यावेळी वाहतूक कोंडी देखील झाली होती. त्यामुळे पोलिस निरीक्षक गणेश गिरी, उपनिरीक्षक विनोद भालेराव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातग्रस्त कार क्रेनच्या साह्याने दूर करून वाहतूक सुरळीत केली. याबाबत पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/s8twHkZ Highway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; दोन जण जखमी

from Chhagan Bhujbal vs Manoj Jarange : भुजबळांना आलेल्या धमकीच्या पत्रावर जरांगे विरुद्ध भुजबळ https://ift.tt/HI7FDBs
Samriddhi Highway Accident : सलग दुसऱ्या दिवशी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
February 10, 2024
0