<p>आता बातमी एबीपी माझाच्या सन्मानाची, ENBA पुरस्कारात एबीपी माझाने बाजी मारलीय. 'आनंदाचे पान' या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमासाठी ENBA पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. तसंच पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्यात आला होता. या पुलाच्या पाडकामाचं एबीपी माझाने ग्राऊंड झीरोवरुन कवरेज केलं होतं, त्या कवरेजसाठी ENBA पुरस्कार देण्यात आलाय. तर रशिया-युक्रेन युद्धाच्या कवरेजसाठी एबीपी न्यूजलाही ईएनबीए पुरस्कार मिळालाय. एबीपी नेटवर्कचे प्रतिनिधी मृत्यूंजय सिंह यांनी युक्रेनमध्ये जाऊन युद्धाचं कवरेज केलं होतं. </p>
from maharashtra https://ift.tt/Z6t1nhi