28th August In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी ठरल्या आहेत. भारतीय पदार्थवैज्ञानिक आणि इस्रोचे माजी अध्यक्ष एम. जी. के. मेनन यांचा आज जन्मदिन आहे. लेखक, चित्रकार व्यंकटेश माडगूळकर यांचा आज स्मृतीदिन आहे.

1906 : रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे यांचा जन्म.

चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे हे मराठीतले एक अग्रगण्य नाट्य-अभिनेते होते. केशवराव दाते हे मामा पेंडसे यांचे अभिनयातले गुरू.नाटकाबद्दल चर्चा करायची असते, हे केशवराव दाते यांच्याडून मामा शिकले. त्यापूर्वी लेखकाने लिहिलेली वाक्ये पाठ करायची, दिग्दर्शकाने दाखवलेल्या हालचाली लक्षात ठेवायच्या आणि प्रेक्षकांकडून दोनचार वेळा हशा-टाळ्या घेतल्या की भूमिका चांगली झाली असा त्यांचा समज होता. हा समज पुढे गैरसमज ठरला आणि मामा एक अभिनयसंपन्न नट बनले. लोकांनी मामांना नटवर्य ही उपाधी दिली.

1928 : भारतीय पदार्थवैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा जन्म

भारतीय भौतिक शास्त्रज्ञ मंबिल्लिकलातिल गोविंद कुमार मेनन तथा एम.जी.के. मेनन यांचा आज जन्मदिन. चार दशकांहून अधिक काळ भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेचे संचालक म्हणूनही कार्यरत होते. मूलभूत कणांचे गुणधर्म शोधण्यासाठी त्यांनी वैश्विक किरणांचे प्रयोग हाती घेतले. कोलार गोल्ड फील्ड्स येथील खाणींमध्ये फुग्याच्या उड्डाणाचे प्रयोग तसेच कॉस्मिक किरण न्यूट्रिनोसह खोल भूगर्भातील प्रयोग उभारण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आग्रहास्तव भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1972 मध्ये नऊ महिने काम केले. 1974 मध्ये संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. 1974 ते 1978 या काळात ते संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. 1978 मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि 1980 मध्ये पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून त्यांनी नियुक्त करण्यात आली. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2001 : लेखक, चित्रकार व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद होता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत. त्यांचा जन्म सांगलीतील माडगूळ येथे झाला.

1949 साली प्रकाशित झालेला 'माणदेशी' हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले. वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी (1951), हस्ताचा पाऊस (1953), सीताराम एकनाथ (1951), काळी आई (1954), जांभळीचे दिवस (1957) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले.

ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी (1955), वावटळ (1964), पुढचं पाऊल (1950), कोवळे दिवस (1979), करुणाष्टक (1982), आणि सत्तांतर (1982), ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत.

व्यंकटेश माडगूळकर हे 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. 'कोवळे दिवस' ह्या कादंबरीत अशाच एका कोवळया स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत. 'पुढचं पाऊल' ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखाविली आहे.

इतर महत्त्वाच्या घटना :

1667: जयपूरचे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन
1749: जर्मन महाकवी, कलाकार योहान वूल्फगाँग गटे यांचा जन्म
1896: उर्दू शायर रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी यांचा जन्म.
1928: सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म
1937: टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली.
1969: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन.
1990: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.

from maharashtra https://ift.tt/dTeNFXv
28th August In History : इस्रोचे माजी अध्यक्ष एमजी मेनन यांचा जन्म, लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन; आज इतिहासात...
August 27, 2023
0
Tags