Ads Area

Maharashtra Rain : कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आज पावसाचा 'यलो अलर्ट', वाचा आजचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain : सध्या राज्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस चांगला झाला आहे. पण काही जिल्ह्यात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे.  दरम्यान, काही भागात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह उपनगर ठाणे पालघर परिसरात जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. राज्यातील कोकणसह विर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

आज कोणत्या विभागात पावसाची नेमकी काय स्थिती?

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग या जिल्ह्यांसह ठाणे आणि पालाघर जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

मुंबईत पावसाचा जोर कमी, मात्र आजही जोरदार पावसाची शक्यता

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर ओसरला असला, तरी संततधार कायम आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील एकूण पाणीसाठा शुक्रवारी सकाळीपर्यंत 68 टक्क्यांवर पोहोचला आहे. या सात तलावांपैकी चार तलाव आतापर्यंत ओव्हरफ्लो झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे मुंबईत कुठेही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची नोंद नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

हिंगोली जिल्ह्यात आठ जिल्ह्यात अतिवृष्टी, शेती पिकांचं नुकसान

हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील 8 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक ओढे आणि नद्यांना पूर आला आहे. त्यामुळं पुराचं पाणी शेतात शिरलं आहे. शेकडो एकर शेती या पाण्यामुळं खरडून गेली आहे. सोयाबीनसह कापूस, हळद, ऊस, केळी या पिकांना फटका बसला आहे. हा पूर इतक्या मोठ्या प्रमाणावर होता की शेतातील माती पिकांसह वाहून गेली आहे. कापूस सोयाबीन पिकाच्या मुळ्या उघड्या पडल्यानं आता ही सर्व पिके नष्ट होणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील पळसगाव शिवारात  शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगोदरच उशिरा पाऊस पडल्याने शेतकरी हैराण होते, त्यात कशातरी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. त्यात आता हा पाऊस यामुळं शेतकरी पुरता हैराण झाला आहे. शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/TBiC3F2 Rain Update : मुंबईत पावसाचा जोर ओसरला, मात्र हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा कायम

from maharashtra https://ift.tt/LQ23gsU

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area