29th July Headline : आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीचे शिष्टमंडळ मणिपूर दौऱ्यावर असणार आहेत. तर, उद्धव ठाकरे आज ठाण्यात असणार आहेत. राज्यात मोहरमच्या निमित्ताने ताबूत मिरवणूक निघणार आहेत.

उद्धव ठाकरे आज ठाण्यात, उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांचा मेळाव्याला संबोधित करणार

आज उद्धव ठाकरे हे आज ठाण्यात येणार आहेत. ठाकरे हे कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाण्यातील पहिल्याच मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज ठाण्यात उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ठाण्यातील गडकरी रंगतायन येथे संध्याकाळी 7 वाजता मेळावा होणार आहे. मागच्या आठवड्यात हा मेळावा इर्शालवाडी दुर्घटनेमुळे रद्द करण्यात आला होता

'इंडिया' आघाडीचे खासदार मणिपूर दौऱ्यावर

मणिपूर हिंसाचार मुद्दा सध्या देशात गाजत आहे. यावरून विरोधी पक्षांनी संसदेत गदारोळ केला आहे. आज आणि उद्या विधी पक्षांचे अर्धात 'इंडिया'चे एक शिष्टमंडळ मणिपूरला भेट देणार आहे. तसेच तेथील परिस्थितीचा आढावा हे शिष्टमंडळ घेणार आहे. अविश्वास प्रस्तावावर चर्चेआधी 16 पक्षाचे 20 खासदार मणिपूरमध्ये जाऊन प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मोहम्मद फैझल उपस्थित राहणार आहेत.

मणिपूर इंफाळ शांतता रॅली

इंफाळमध्ये आज शांतता पदयात्रा काढण्यात येणार आहे. मेईतेई समाजाच्या कोकोमी ग्रुपने या रॅलीचे आयोजन केलं आहे. यामध्ये मेईतेई समाजाचे लोक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

मोहरम निमित्ताने ताबूत मिरवणूक

पुणे - पुण्यातील पेशवेकालीन ताबुतांची आज मिरवणूक निघणार. पेशव्यांकडून या ताबुतला तोफांची सलामी दिली जायची. लोकमान्य ळक या ताबूत मिरवणुकीत सहभागी व्हायचे.

सांगली - हिंदू - मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील प्रासिद्ध असलेल्या मोहरम मधील गगनचुंबी ताबूत भेटींचा अनोखा सोहळा पार आज पार पडणार आहे. मोहरमची 150 वर्षापासून परंपरा सुरु आहे.

अहमदनगर मोहरम निमित्ताने आज दुपारी बारा वाजता शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. मागील काही दिवसांपासून नगरमध्ये झालेल्या हिंदू मुस्लिम संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही मिरवणूक निघणार आहे.

संभाजी भिडेंविरोधात आंदोलन

- अमरावतीमध्ये संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी बद्दल अत्यंत अवमानकारक विधान करून त्यांचा अपमान केला आहे. काँग्रेस आमदार यशोमती ठाकून यांच्या नेतृत्वाखाली संभाजी भिडेच्या वक्तव्याचा निषेध आज राजकमल चौकात करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर - संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसकडून शहरातील क्रांती चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.

- पुणे – संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून बालगंधर्व चौकात तर कॉंग्रेसकडून फडके हौद चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांचा आज शपथविधी

मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांचा आज शपथविधी समारंभ आहे. राजभवनात राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना शपथ देतील.

from maharashtra https://ift.tt/OXqgMlw
29th July Headline: 'इंडिया'चे शिष्टमंडळ मणिपूर दौऱ्यावर, उद्धव ठाकरे आज ठाण्यातील मेळाव्याला संबोधित करणार; आज दिवसभरात
July 28, 2023
0
Tags