Ads Area

मणिपूर हिंसाचारानं भारताला जगात कलंकित केलं, याला भाजप सरकार जबाबदार - नाना पटोले

Nana patole On BJP : मणिपूरमध्ये जी काही परिस्थिती या दिवसात निर्माण झालेली आहे. त्यावर देशाचे प्रधानमंत्री बोलायला तयार नाहीत. मणिपूर आणि केंद्रातही भाजपचं सरकार असून आम्हाला डबल इंजिनचं सरकार द्या, म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचा शब्द कुठे आहे. मणिपूरच्या या घटनेने देशातच नव्हे तर जगात भारताला कलंक लावण्याचं पाप मनुस्मृतिच्या व्यवस्थेनं केली आहे. जे सत्तेत बसलेले आहे त्यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. महिलांचा अपमान करणे महिलांच्या बद्दल कुठली आदर भावना मनात न ठेवणे. ही भावना मनुस्मृतिची होती, तीच पुढे आपल्याला भाजपच्या सत्तेत पाहायला मिळत आहे. संपूर्ण घटनेला भाजप सरकार जवाबदार आहे. ती आता संपूर्ण देशानं आणि जगानं मान्य केलेय, अशी टीका नाना पटोले यांनी मणिपूर हिंसाचारावर बोलताना केली.

भाजप सत्तेच्या मस्तीत - नाना पटोले यांची भाजपवर टीका

आम्ही कोणावरही व्यक्तिगत टीका केली नाही, मात्र भाजप कलंक आहे. जर व्यक्तिगत टीका केली असेल तर ती करण्याचा कोणाला अधिकार नाही. अजित पवार व फडणवीस यांच्या वाढदिवसाचे बॅनर नागपुरत झळकलेत, त्या बॅनरवर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त असल्याचे नमूद आहे. त्यामुळे आमच्या मित्राचा वाढदिवस दररोज असाच साजरा व्हावा, दररोज एक - एक रुपया कमी व्हावा. 100 रुपयावर गेलेले पेट्रोल दहा - पंधरा रुपयावर यावं. ही आमची अपेक्षा आहे. भाजप सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेचं जगनं मुश्किल झाले आहे. त्याची चिंता भाजपला नाही. भाजप सत्तेत मस्ती करत असून सामान्यांच्या जीवन बेहाल करण्याच्या काम भाजप करत असल्याची टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली. नागपूर येथे  देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरवर फडणवीस कलंक नसून महाराष्ट्राचे भूषण आहेत, असे लिहिलेले बॅनर नागपुरात झळकलेत यावर नाना पटोले बोलत होते.

महाराष्ट्रावर पूरपरिस्थिती मुख्यमंत्री दिल्लीत जाणे भूषनावह नाही....निवडणुकीनंतर सत्तेबाहेर बसतील

सत्तेत सहभागी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजी नगर येथे पहिली सभा झाली. त्यात शिंदे यांनी मोदी आणि शहा यांचे हस्तक असल्याचे सांगितले होते. शिंदे यांचे राज्याच्या जनतेवर कमी आणि केंद्रातील मोदी आणि शहा या त्यांच्या आकांवर जास्त लक्ष आहे. महाष्ट्रावर पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोदी आणि शाहा यांचे हस्तक समजून त्यांना भेटाला गेले हे महाराष्ट्रासाठी भूषनावह नाही. त्यामुळे किती दिवस मुख्यमंत्री राहतील किंवा नाही राहतील, पण ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका पार पडतील, त्यावेळी हे सर्व सत्तेच्या बाहेर जातील अशी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर केली.

from maharashtra https://ift.tt/qa7J4A1

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area