Ads Area

1st August Headline : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर, संसदेच्या अधिवेशनात मणिपूर हिंसाचारावरून गदारोळाची शक्यता? आज दिवसभरात...

1st August Headline : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात पुणे दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याशिवाय, पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यात विविध योजना, सुविधांचे उद्घाटन करणार आहे.

संसद अधिवेशन

-        संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही मणिपूरच्या मुद्द्यावर गदारोळ होण्याची शक्यता आहे. सोमवारी राज्यसभेच्या सभापतींनीही नियम 176 अन्वये चर्चा सुरू करण्याबाबत चर्चा केली. मात्र विरोधकांना नियम 267 अन्वये चर्चा हवी असल्याने चर्चा सुरू हऊ शकली नाही.

-        दिल्लीच्या ट्रान्सफर पोस्टिंगशी संबंधित विधेयक आज लोकसभेत मांडले जाऊ शकते आणि त्यावर चर्चाही होऊ शकते. या विधेयकाला सर्व विरोधी पक्षाचा विरोध आहे.

-        आज लोकसभेच्या बिजनेस सल्लागार समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होऊ शकते. या बैठकीत या प्रस्तावावर कोणत्या दिवशी आणि किती दिवस चर्चा होणार हे निश्चित होणार आहे.

-       'इंडिया' आघाडीच्या नेत्यांची आज सकाळी 10 वाजता राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत सभागृहातील रणनितीवर चर्चा होणार आहे.

पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असणार आहे. पंतप्रधान मोदी यांना टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याशिवाय, पुणे मेट्रो आणि इतर विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या पुणे दौऱ्यानिमित्त पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व प्रमुख रस्ते सकाळी 6 वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो सेवेचा बहुप्रतीक्षित विस्तार आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.  वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय (सिव्हिल कोर्ट) दरम्यान आज मेट्रो सेवा सुरु होणार आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात वनाझ ते गरवारे कॉलेज आणि पिंपरी- चिंचवड ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो सेवा कार्यान्वित झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यात आंदोलनाचा इशारा

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्या  वेळी आंदोलनाचा इशारा दिल्याने पुणे पोलिसांकडून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 149 नुसार पुणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर महाविकास आघाडी आणि डाव्या-पुरोगामी पक्षांच्या प्रागतिक पक्षांच्या आघाडीने आंदोलनाची हाक दिली आहे.

औरंगाबादमध्ये संभाजी भिडे यांचे व्याख्यान होणार?

संभाजी भिडे याचं कॅनॉट परिसरातील अग्रेसन भवन येथे संध्याकाळी व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आयोजकांना पोलिसांनी लेखी पत्र देऊन परवानगी नाकारल्याचे म्हटले. काँग्रेससह इतर संघटनांनी आज भिडे गुरुजीचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.

आज कोर्टात महत्त्वाची सुनावणी

-    कथित एसआरए घोटाळा प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलीसांनी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तूर्तास पेडणेकर यांना हायकोर्टानं अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे.

-  दापोली साई रिसोर्ट प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या जामीनावर आज फैसला होणार आहे. 10 जुलै रोजी राखून ठेवलेला निकाल आज विशेष पीएमएलए कोर्टात जाहीर होण्याची शक्यता आहे.

from maharashtra https://ift.tt/YNomIs2

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area