Maharashtra Rain News: राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं (Heavy rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र दिसत आहे. राज्यात सुरु झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिेलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

परभणी जिल्ह्यात यंदा दोन नक्षत्र कोरडी गेल्यानंतर अखेर पावसानं हजेरी लावली आहे. परभणी शहरासह जिल्हाभरात रात्री जोरदार पाऊस झाला. जवळपास एक ते दीड तास सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य परभणीकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उशिरा का होईना यंदाच्या मोसमातील हा पहिलाच पाऊस जोरदार झाल्यानं शेतकरी आनंदी आहेत.

गोंदियात जोरदार पाऊस, नाल्याच्या पुरात एकजण गेला वाहून

गोंदिया जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. अशातच मोरगाव अर्जुनी तालुक्यातील अरततोंडी-पिंपळगावमध्ये नाल्याच्या पुरात एकजण गेला वाहून गेल्याची घटना घडली. त्याची शोधमोहीम सुरु आहे. अरततोंडी-पिंपळगाव दरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावरुन एक अनोळखी व्यक्ती सायकलसह वाहून गेला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात सोमवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे.

उत्तर ओडिशा परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अशात पुढील दोन दिवसात उत्तर मध्य प्रदेशाकडे सरकणार आहे. सोबतच पश्चिमी किनारपट्टी भागात देखील कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. अशात मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. सोबतच ठाणे आणि रायगड परिसरात देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावासाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेची टीम सक्रीयपणे संपूर्ण महानगरात कार्यरत आहे. मलवाहिनी किंवा पर्जन्य जलनिःसारण वाहिनीवरील झाकण उघडल्याने नागरिकांना गंभीर अपघाताची शक्यता असते. त्यामुळे प्रवेशिकांचे झाकण (मॅनहोल) उघडू नये, असे आवाहन पालिकेनं केलं आहे. या बाबींचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे.

from maharashtra https://ift.tt/cgFEt3a
Maharashtra Rain : रजयत कह भगत जरदर पऊस ककणसह पशचम महरषटरत ऑरज अलरट तर मबईसह ठणयल यल अलरट
June 27, 2023
0
Tags