Ads Area

3rd June In History: देशाचा भूगोल बदलला... भारताच्या फाळणीची घोषणा आणि गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन; आज इतिहासात

3rd June In History: भारताच्या इतिहासाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्याच दिवशी भारताचा इतिहास आणि भूगोल बदलला. 3 जून 1947 रोजी भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीची घोषणा लॉर्ड माउंटबॅटन यांनी केली. ही घटना 'थर्ड जून प्लॅन' किंवा 'माउंटबॅटन प्लॅन' म्हणून ओळखली जाते. तसेच राजकीय दृष्टीकोनातून आज एक दुर्दैवी घटना घडली असून आजच्याच दिवशी भाजचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झालं होतं. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या विस्ताराने जाणून घेऊया,

1867: भारतातील प्रसिद्ध शिक्षणतज्ञ, राजकारणी, समाजसुधारक, न्यायशास्त्रज्ञ आणि लेखक हरविलास शारदा यांचा जन्म.

1901: ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले विजेते महाकवी शंकर कुरूप यांचा जन्म.

1915: रवींद्रनाथ टागोर यांना ब्रिटिश सरकारची नाईटहूड पदवी

रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) हे जगप्रसिद्ध कवी, साहित्यिक, तत्त्वज्ञ आणि भारतीय साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते आहेत. त्यांना गुरुदेव म्हणूनही ओळखले जाते. बांगला साहित्यातून भारतीय सांस्कृतिक जाणिवेला त्यांनी नवसंजीवनी दिली. ते आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते आहेत. ते एकमेव कवी आहेत ज्यांच्या दोन रचना दोन देशांचे राष्ट्रगीत बनल्या, भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत 'आमार सोनार बांगला' गुरुदेवांच्या स्वतःच्या रचना आहेत. त्यांना आजच्याच दिवशी म्हणजे 3 जून 1915 रोजी ब्रिटिश सरकारने नाईटहूड पदवीने सन्मान केला.

1918: महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली इंदूरमध्ये 'हिंदी साहित्य संमेलन' आयोजित.

1924: एम. करुणानिधी यांचा जन्म

तामिळनाडूचे लोकप्रिय नेते आणि माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी (M. Karunanidhi) यांचा जन्म 3 जून 1924 रोजी झाला. चित्रपटांपासून सुरु होऊन मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचलेला करुणानिधी (M. Karunanidhi) यांचा प्रवास अत्यंत रंजक आहे. करुणानिधी यांनी तामिळ मनोरंजनविश्वात नाटककार आणि पटकथा लेखक म्हणून काम केलं आहे. करुणानिधींच्या चाहत्यांनी त्यांना 'कलैनर' हे नाव बहाल केलं आहे. कलैनर म्हणजे तामिळ भाषेत कलेतील विद्वान.

दक्षिण भारतातील हिंदी विरोधी आंदोलनात ते सहभागी झाले होते. 1937 मध्ये शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य केल्याने युवकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. करुणानिधी यांनी तामिळ भाषेतच नाटकं लिहिण्यास सुरुवात केली. तामिळ भाषेवरील त्यांचं प्रभुत्व पाहून समाजसुधारक पेरियार आणि द्रमुकचे तत्कालीन प्रमुख अन्नादुराई यांनी त्यांना 'कुदियारासु' वाहिनीचे संपादक केलं. पेरियार आणि अन्नादुराई यांच्यात मतभेद झाल्यानंतर करुणानिधी अन्नादुराई यांच्यासोबत गेले. त्यानंतर करुणानिधींना मागे वळून पाहिलं नाही. करुणानिधी बारा वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते तर पाच वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

1930: माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म

बंद सम्राट अशी ओळख असलेले कामगार नेते आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस (George Fernandes) यांचा जन्म 3 जून 1930 रोजी झाला. मुंबईतील कामगार चळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. नंतरच्या काळात अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षणमंत्रीपद भूषवलं.

1947: भारताच्या फाळणीची घोषणा (Indian Independence Act 1947)

3 जून 1947 रोजी भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीची घोषणा त्यावेळचे ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन (Mountbatten Plan 1947) यांनी केली. ही घटना 'थर्ड जून प्लॅन' किंवा 'माउंटबॅटन प्लॅन' म्हणून ओळखली जाते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावर पाकिस्तानची मागणी केली जावू लागली. त्यासाठी मुस्लिम लिगने देशभरात दंगली घडवून आणल्या. देशात दंगली होत होत्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न प्रांतांकडे असल्याने केंद्रातील सरकार परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकले नाही. म्हणून राजकीय आणि जातीय गोंधळ संपवण्यासाठी, 'थर्ड जून प्लॅन' मान्य करण्यात आली. त्यानुसार भारताची फाळणी केली जाईल, त्यातून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून माउंटबॅटन यांनी सत्ता हस्तांतरणाचा तपशील सादर केला.

1959: सिंगापूरला स्वशासित राज्य घोषित करण्यात आले.

1972: देशाच्या पहिल्या आधुनिक युद्धनौका निलगिरीचे देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

1974: बिहारचे मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक कृष्ण बल्लभ सहाय यांचे निधन.

1985: भारत सरकारने पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा सुरू केला.

1999: हॉवरक्राफ्ट विमानांचा शोध लावणारे ख्रिस्तोफर कॉकरेल यांचा मृत्यू.

2005: फ्रान्सने सुरक्षा परिषदेत भारताच्या दाव्याला पाठिंबा दिला.

2014 : माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे 3 जून 2014 रोजी निधन झालं. दिल्ली विमानतळाच्या दिशेने जात असताना त्यांचं निधन झालं. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

गोपीनाथ मुंडेंनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. इंदिरा गांधींनी भारतात लावलेल्या आणिबाणी विरोधात त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी अटक करुन त्यांना नाशिकच्या तुरुंगात टाकण्यात आलं. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.

गोपीनाथ मुंडेंनी 1980–1985 आणि 1990–2009 या काळात पाच वेळा विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलं. 1992-1995 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. महाराष्ट्रात 1995 साली ज्यावेळी युतीचं सरकार आलं त्यावेळी त्यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले.

2009 साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि प्रचंड मतांनी विजय मिळवला. लोकसभेत त्यांची भाजपच्या उपनेतेपदी निवड झाली. केंद्रात मोदींचं सरकार आलं त्यावेळी 26 मे रोजी त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांच्या कार्यकर्त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. केवळ एका आठवड्यानंतर 3 जून रोजी दिल्ली विमानतळाकडे जाताना गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

from maharashtra https://ift.tt/6ta7xbI

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area