Ads Area

3rd June Headlines: समीर वानखेडे प्रकरणी हायकोर्टात सुनावणी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर; आज दिवसभरात

3rd June Headlines:  आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज राज्यात सुवासिनी महिलांमध्ये वटपौर्णिमेचा उत्साह असणार आहे.  एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सीबीआयकडून कोर्टात अहवाल सादर केला जाणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्यावतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराचे नागपूरमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करतात. यात वडाची पूजा केली जाते आणि स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून कुटुंबाला व पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य, मुले-बाळं, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला मनोकामना करतात.

मुंबई

- एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी, सीबीआय आपला अहवाल सादर करणार

- आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भात काँग्रेसने जिल्हा निहाय आढावा बैठक घ्यायला सुरुवात केलेली आहे. या दोन दिवसांच्या बैठकांमध्ये संपूर्ण राज्यातील आढावा बैठक घेतली जाणार आहे... या आढावा बैठकींचं आज दुसरा दिवस असून राज्यातील सर्व वरिष्ठ काँग्रेसचे नेते या बैठकांसाठी उपस्थित असणार आहे.

- एसटीचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, मंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती.

- आयएमसी सीईओ कॉनक्लेव्हचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

- काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा उत्तर पश्चिम मुंबईत नाले सफाई दौरा करणार आहेत. मान्सून पूर्व "नाले सफाई दौरा"  निरुपम काही नाल्यांना भेट देणार आहेत.

पुणे

- शरद पवारांच्या उपस्थितीत शनिवारी पुण्यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राज्यभरातील जिल्हा कुस्ती संघ आणि सहयोगी संघ असे मिळून 45 संघांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.

नागपूर

- राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्यावतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीर / कार्यशाळा नागपूरात 3 व 4 जुनला आयोजित करण्यात आले आहे.

बीड

- आज माजी केंद्रिय मंत्री गोपीनाथ यांची पुण्यतिथी असून त्यानिमित्ताने गोपीनाथ गडावर अनेक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूर

-  भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी@ 9 याचे कार्यक्रम घेणार आहेत.

बुलढाणा

- वट पौर्णिमेनिमित्त सामाजिक वनीकरण विभाग व राजे लखोजि जाधव विद्यालयाच्या विद्यमाने सिंदखेड राजा येथे पाच हजार महिलांना वटवृक्ष वाटप करण्यात येणार आहे.

भंडारा

-  बॉस्केटबॉल असोसीएशन भंडारा जिल्हा आणि एकविध क्रीडा संघटनेच्या संयुक्त विद्यमानं विभागीय स्तरीय बॉस्केटबॉल स्पर्धेचे 3 आणि 4 जून ला आयोजन करण्यात आलं आहे.

अमरावती

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज अमरावती दौऱ्यावर आहेत.

from maharashtra https://ift.tt/QmR4Crl

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area