Ads Area

Uddhav Thackeray Will Visit Shirdi: उद्धव ठाकरे सहकुटुंब शनी शिंगणापूर अन् साईबाबांच्या शिर्डी दौऱ्यावर

Uddhav Thackeray Will Visit Shirdi: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Shiv Sena) अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शुक्रवारी शिर्डी (Shirdi) येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (Shani Shingnapur) मंदिराला भेट देणार आहेत. पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात ही माहिती दिली. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरेही (Rashmi Thackeray) असण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे सहकुटुंब शनी शिंगणापूर आणि शिर्डी दौऱ्यावर

आज सकाळी 11 वाजता मुंबई येथून शिर्डी विमान तळाकडे प्रयाण

12 वाजता शिर्डी विमानतळाहुन सोनईकडे प्रयाण

सोनई येथे यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त भेट

त्यानंतर शनी शिंगणापूर येथे शनी दर्शन

दुपारी 2 वाजता गाडीनं शिर्डीकडे प्रयाण

3 वाजता शिर्डी साईबाबा समाधी दर्शन

4 वाजता शिर्डी विमानतळ येथून मुंबईकडे रवाना

शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील 2022 च्या राजकीय सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयानं बहुप्रतीक्षित निकाल दिला. यामध्ये शिंदे गटातील आमदारांसह राज्यपाल आणि त्यावेळचे विरोधीपक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवरही सर्वोच्च न्यायालयानं आक्षेप घेतला. पण सगळं अडलं उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं दिलेल्या राजीनाम्यावर. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर, पुन्हा सरकार आणण्याचा प्रयत्न केला असता, असं वक्तव्य सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलं आणि सत्तेत असलेलं शिंदे सरकार बचावलं. अशातच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब देवदर्शन करणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं गुरुवारी एकमतानं दिलेल्या निकालात म्हटलं आहे की, ते तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकारला पुनर्स्थापित करू शकत नाही, कारण माजी मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये बहुमत चाचणीला सामोरं न जाता राजीनामा दिला होता. या आदेशाचा अर्थ असा आहे की, शिवसेनेतील बंडखोरांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदावर कायम राहतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/NyfL8lK Thackeray : उद्धव साहेब खुर्चीला चिटकून बसले नाहीत, त्यांच्या मनाला जे पटलं ते केलं : आदित्य ठाकरे

from maharashtra https://ift.tt/tN4UQyF

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area