Ads Area

Rahul Kulkarni : राहुल कुलकर्णींच्या अटक प्रकरणी तत्कालीन ठाकरे सरकारला चपराक : ABP Majha

<p>आता बातमी आहे एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याविषयीची...कोरोना काळात एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना अटक करणाऱ्या ठाकरे सरकारला चपराक मिळालीय. मविआ सरकारने केवळ संशयातून राहुल कुलकर्णी यांना अटक केली होती. बांद्रा रेल्वे स्टेशनवर कोरोनाकाळात बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या मजुरांची गर्दी झाली होती. त्या बातमीचा एबीपी माझाच्या एका बातमीशी संबंध जोडून राहुल कुलकर्णी यांना कुठल्याही सूचनेशिवाय अटक केली होती. शिवाय त्यांच्यावर गुन्ह्यांची कलमे चुकीची लावली होती. या निमित्ताने माझाच्या बातमीच्या सत्यतेवर पुन्हा शिक्कामोर्तब झालंय. राहुल कुलकर्णी यांच्याकडे बातमीची पुरेशी कागदपत्रं होती आणि पोलिसांना कुठलाही पुरावा सापडला नाही. या प्रकरणी ठाकरे सरकारनेच बांद्रा न्यायालयामध्ये पोलिसांनी अंतिमतः आपल्याकडून चूक झाल्याचा अहवाल दिला होता. त्याचा आदेश आता जारी झालाय...&nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/JnKuSoD

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area