नागपूर : मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपी नीरज सिंह राठोड यांने तब्बल 28 आमदारांची फसवणूक केल्याची माहिती नागपूर पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे नीरज सिंहच्या सीडीआरमध्ये 28 आमदारांचे फोन नंबर आढळून आले असून त्यातील तीन आमदारांनी ऑनलाईन पैसे पाठवल्याचंही तपासात समोर आले आहे. महाराष्ट्र, गोवा आणि नागालँडसह पश्चिम बंगाल व झारखंड या राज्यातील काही आमदारांचे मोबाईल क्रमांक मिळाले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सारखा आवाज काढून नीरज सिंहने आमदारांची फसवणूक केली. नीरज सिंह यांच्या आवाजामुळे भाजपच्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची भुरळ पडली होती. फेब्रुवारी 2023 पासून अगदी काल परवापर्यंत महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक आमदारांना निरज सिंह राठोड नावाच्या एका व्यक्तीचे फोन येत होते. तो स्वतःला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक सांगत असे. महाराष्ट्रातील भाजप आमदारांना तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्याचे ठरले आहे असे सांगायचा. एवढचं नाही तर तुम्हाला कोणता मंत्रिपद हवा आहे याची विचारणा देखील करायचा.

भाजप आमदार विकास कुंभारे यांना 7 मे पासून काही दिवस सतत नीरज सिंह राठोड याचे फोन येत होते. सुरुवातीला विकास कुंभारे यांचा आपल्याला खरंच राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यालयातून फोन येत आहे असंच वाटलं. मात्र नंतर मंत्रिपदाच्या मोबदल्यात पैशाची मागणी होऊ लागल्यामुळे विकास कुंभारे यांना शंका आली. त्यांनी चौकशी केली असता हा त्यांना लुबाडण्याचा प्रकार असल्याचे लक्षात आलं. त्यानंतर कुंभारे यांनी नागपूर पोलिसांकडे रीतसर तक्रार दिली फेब्रुवारी महिन्यात नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघाचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांच्यासोबत ही घडले होते. त्यांना एका गरीब भाजप नेत्याला मदत करण्याच्या नावाखाली मंत्रिपदाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करण्यात आली होती.

एक नव्हे तर अनेक आमदारांची अशाच पद्धतीने फसवणूक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नागपूर पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर नागपूर पोलिसांनी नीरज सिंह राठोड या भामट्याचा फोन सर्विलंन्स वर ठेवला. तो गुजरातमधील मोरबी मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि नागपूर पोलिसांच्या पथकाने काल संध्याकाळी त्याला मोरबी मधून ताब्यात घेतले. नी

नीरज सिंह राठोड या भामट्याने याच पद्धतीने महाराष्ट्रातील भाजप आमदार नारायण कुचे, राजेश पाडवी यांच्यासह गोव्यातील भाजप आमदार प्रवीण आगलेकर आणि नागालँड मधील भाजप आमदार मोवा चेंग यांची ही फसवणूक करण्याचे प्रयत्न केले असल्याची माहिती आहे. नीरज सिंह यांच्यावर अशाच पद्धतीने आधीही फसवणूक केले असल्याचे गुन्हे दाखल आहेत.

from maharashtra https://ift.tt/YKictnZ
Neeraj Singh: मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांना लुटणाऱ्या नीरज सिंह राठोडच्या सीडीआरमध्ये 28 आमदारांचे मोबाईल नंबर
May 20, 2023
0
Tags