Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/ZfCwgX2 Elections: आज दुपारपर्यंत कर्नाटकचा कौल स्पष्ट होणार, बेळगावातील 18 मतदारसंघांकडे विशेष लक्ष

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. आज दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर बेळगावातील 18 मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होतील.

कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे.

<a href="https://ift.tt/Cco2pHw News: चित्रपट पाहण्यासाठी बुरखा घातला; त्यावरून दोन गटात वाद; उदगीर शहरातील प्रकार

Latur News:  हल्ली कोणत्या कारणांवरून तणाव निर्माण होईल, कोणाच्या भावना दुखावतील याचा नेम नाही. असाच एक प्रकार लातूर जिल्ह्यात घडला आहे. दोन गटातील तणावासाठी निमित्त ठरलंय बुरख्याचं. त्यावरून समाजातील दोन गटात वाद निर्माण झाला आहे. ही घटना आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात घडली आहे.

प्रकरण नेमकं काय?

उदगीरमधील एक अल्पवयीन जोडपं बुरखा घालून काही मित्रांसोबत चित्रपट पाहायला गेले होतं. बुरखा घातलेल्या मुलीसोबत काही मुलं चित्रपट पाहात असल्याची माहिती काही तरुणांना कळली. त्यानंतर या तरुणांनी त्या मुलांना मारहाण केलीच, शिवाय रिक्षामधून अंड्याच्या दुकानात नेऊन पुन्हा मारलं. मारहाणीचे व्हिडीओदेखील काढले. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलांनी त्यांच्या पालकांना झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच चार आरोपींना अटक केली. दरम्यान, या प्रकरणी खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप करत दोन दिवसांपासून समाजातील काही लोक उदगीर शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत आहेत.

from maharashtra https://ift.tt/Qj2wEeV
Maharashtra News Updates 13th May 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
May 12, 2023
0
Tags