Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आज निकाल

Maharashtra Political Crisis Chronology: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा (Maharashtra Politics) बदलवणारा हा निकाल असणार आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी काल (10 मे) एका प्रकरणाची सुनावणी करत असतानाच 11 मे रोजी दोन महत्वाच्या प्रकरणांवर घटनापीठ निकाल देणार असल्याचे सांगितले. त्यामुळं सर्वच जणांचे लक्ष आजच्या या निकालाकडे लागलं आहे. देशाच्या राजकीय इतिहासातील सर्वात किचकट प्रकरण असलेल्या निकालाचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या पद्धतीने विश्लेषण करणार? याकडे फक्त राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष आहे.

मागील वर्षी जून महिन्यात झालेली विधानपरिषदेची ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक ठरली. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. संख्याबळ कमी असतानाही भाजपनं हे कसं साधलं याची चर्चा सुरु असतानाच अचानक वेगळ्या नाट्याला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह काही आमदार हे सुरतच्या दिशेनं निघाल्याची बातमी आली आणि तिथूनच सुरु झाला महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा सत्तासंघर्ष. हा सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टातही कित्येक महिने गाजत राहिला.

शिवसेनेतल्या अंतर्गत कलहानंतर बैठकांचं सत्र सुरु झालं. दोन्ही गटांनी आपापले गटनेते, व्हिप जाहीर केले. बैठकीला आला नाहीत तर अपात्रतेची कारवाई होईल असे इशारेही दिले गेले. एकीकडे ठाकरे गटाकडून ही हालचाल तर दुसरीकडे शिंदे गटानं तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वासाची नोटीस आणली. तिथूनच या कायदेशीर पेचाला सुरुवात झाली.

प्रवीण दरेकर घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

भाजप आमदार प्रवीण दरेकर हे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.
आज सकाळी नऊ वाजता प्रवीण दरेकर राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. येत्या 14 मे रोजी गोरेगाव नेस्को येथे गृहनिर्माण सोसायट्यांची सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने प्रवीण दरेकर आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.

from maharashtra https://ift.tt/vsbODch
Maharashtra News LIVE Updates : देश विदेशातील घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
May 10, 2023
0
Tags