Beed News : राज्याच्या काही भागात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपीटीचा फटका शेती पिकांना बसत आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. बीड जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं नुकसान झालं आहे. विशेषत कांदा उत्पादक (Onion Farmers) शेतकऱ्यांना या अवकाळीचा जास्त फटका बसला आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा चाळीमध्ये टाकण्यापूर्वीच सडला आहे.

कांद्याला फुटू लागले कोंब

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं राज्यातील बळीराजा हवालदील झाला आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. बीड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी करुन शेतात टाकलेला कांदा अवकाळी पावसामुळे पूर्णपणे सडून गेला आहे. या कांद्याला आता कोंब फुटू लागले आहेत. तर दुसरीकडे बाजारमध्ये सध्या कांद्याला पाच रुपये किलोचा भाव मिळत आहे. शिल्लक राहिलेला कांदा निवडून कांदा चाळीमध्ये टाकण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळं यावर्षीच्या कांद्याच्या उत्पादनात शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

नाफेडकडून कांद्याची खरेदी कधी होणार?

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. याचा मोठा आर्थिक राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. अशातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. या स्थितित कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे. नाफेडमार्फत (Nafed) तात्काळ कांद्याची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal ) यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी गोयल यांना निवेदनही दिलं आहे. अद्यापही याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. कांदा उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात होणाऱ्या कांदा उत्पादनापैकी जवळपास 30 टक्के कांदा महाराष्ट्रात पिकतो. मात्र, मागील काही महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे मत भारती पवार यांनी व्यक्त केले. सद्यस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किंमती विचारात घेता नाफेडमार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तात्काळ राबवण्यात यावी, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी मंत्री गोयल यांच्याकडे केली आहे. त्यामुळं त्यांच्या या मागणीवर सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/yMEA3dH News : नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी करावा, राज्यमंत्री डॉ. भारती पवारांची मंत्री गोयल यांच्याकडे मागणी

from maharashtra https://ift.tt/s5pWykZ
Beed News : चाळीत टाकण्यापूर्वीच कांदा सडला, अवकाळीचा बीड जिल्ह्याला फटका; शेतकरी चिंतेत
May 10, 2023
0
Tags