Ads Area

Shambhuraj Desai : काका मला वाचवा म्हणायला तर सिल्व्हर ओकला गेले नाहीत ना? शंभुराज देसाईंचा उद्धव ठाकरेंना टोला

Shambhuraj Desai : सगळं गुंडाळून काका मला वाचवा म्हणायला तर सिल्व्हर ओकला गेले नाहीत ना? असा सवाल करत मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लगावला. तर सकाळी मातोश्रीवर स्वाभीमानाच्या बाता मारायच्या आणि संध्याकाळी सिल्वर ओकवर जाऊन लोटांगण घालणाऱ्यांनी मातोश्रीचं नाव धुळीला मिळवलं आहे. बाळासाहेबांचे वारसदार म्हणवण्याचा त्यांना मुळीच नैतिक अधिकार राहिला नसल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाली. त्यानंतर या भेटीवर शिवसेना शिंदे गटाकडून टीका केली जातेय.

महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वेदना

उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर दाखल झाली यांची ब्रेकिंग पहिली. मातोश्रीचा इतिहास आहे, कितीही मोठा नेता असला तरी बाळासाहेबांना भेटायला येत होते. पण आज वेदना झाल्या. आज मराठी बाणा, बाळासाहेब यांचा वारसा सोडून लोटांगण घालत सिल्व्हर ओकला दाखल झाले. महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वेदना झाल्याचे शंभुराज देसाई म्हणाले. सगळं गुंडाळून काका मला वाचवा म्हणायला तर सिल्व्हर ओकला गेले नाहीत ना? असा खोचक टोला देसाईंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

महाविकास आघाडीमध्ये दरी पडण्यास सुरूवात

सावरकर यांच्याबद्दल जे वक्तव्य करण्यात आलं त्यावर भूमिका मांडली नाही. जेपीसीबाबत संजय राऊत भूमिका मांडतात पण याच मुद्द्यावर पवार गरज नसल्याचे सांगतात. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये दरी पडण्यास सुरूवात झाली असल्याचे देसाई म्हणाले. मविआमध्ये होत असलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यावरुन मविआ टिकेल की नाही हे कळत असल्याचे देसाई म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओक आहे हे कळत होते. एकीकडे ठाकरे घराणे स्वतःकडे रिमोट कंट्रोल ठेवला पण आता हा रिमोट कंट्रोल सिल्व्हरवर असल्याचे देसाई म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय राऊत उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपल्याचे देसाई म्हणाले.

शरद पवारांनी राजकारणात अनेकांना कात्रजचा घाट दाखवला

उद्धव ठाकरे यांनी आजवर आमच्यासारख्या अनेक कट्टर शिवसैनिकांना वापरून फेकुन दिल्याचे नरेश म्हस्के म्हणाले. परंतू, पवारसाहेब आता आपल्याला वापरुन फेकून देत असल्याचं बहुतेक त्यांना कळू लागलंय. त्यामुळेच ते सिल्हवर ओकवर लोटांगण घालायला चालले असावेत असं म्हस्के म्हणाले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते हे आम्हाला माहित नव्हतं असं सांगून पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नऊ महिन्यानंतर त्यांनी ही गुपित बाहेर का काढलं, हे न कळण्याइतकं  कुणीही दुधखुळं नसल्याचे म्हस्के म्हणाले. शरद पवारांनी राजकारणात आजवर अनेकांना कात्रजचा घाट दाखवलेला आहे. उद्धव ठाकरेंचा याच घाटातून कडेलोट होण्याची वेळ आता लांब राहिलेली नसल्याचे म्हस्के म्हणाले. सावरकरांच्या अपमानाच्या मुद्यावरून बाळासाहेबांसारखी आक्रमक भूमिका घेण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्यात राहिलेली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावर आघाडीत एकमत नाही. सावरकरांच्या हिंदू राष्ट्राची संकल्पना आम्हाला मान्य नाही असं पवार म्हणालेत. त्यावर उद्धव ठाकरेंकडे बोलायला शब्द आहेत का? असा सवाल म्हस्केंनी केला.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/cZOlCj6 Pawar Uddhav Thackeray :  मविआत मतभिन्नता; पवारांच्या भेटीसाठी ठाकरे सिल्वर ओकवर, बंद दाराआड सव्वा तास चर्चा

from maharashtra https://ift.tt/oKJFczy

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area