<p>Mahableshwer CM Meet: महाबळेश्वर विकासकामांचा आढावा, मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापलं</p> <p>राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्या दरे या गावात आहेत. मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरित्या त्यांच्या सुट्टीबाबतची माहिती दिली नसली तरी विरोधकांकडून त्यांच्या दौऱ्यावर टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोमवारी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर, कर्मचाऱ्यांना ते गावी जात असल्याची कल्पना दिली. त्यामुळं मुख्यमंत्री सोमवारपासून तीन दिवस सुट्टीवर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्या दरे गावात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी आज त्यांच्या गावात आपल्या शेतीची पाहणी केली. त्यांनी मंत्रिमंडळातील सहकारी शंभुराज देसाई यांच्याशी चर्चाही केली. महाराष्ट्राच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री अचानक सुट्टीवर गेल्यामुळं राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाच्या मुद्यावर कोकणात आंदोलन पेटलेलं असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रजेवर गेले आहेत. हा काय प्रकार आहे अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी या दौऱ्यातच महाबळेश्वरमध्ये जात अधिकाऱ्यांसह विकास कामांची आढावा बैठक घेतली.</p>
from maharashtra https://ift.tt/dmo9sMw
CM Eknath Shinde Mahabaleshwar Meeting :आढावा बैठकीत मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापलं
April 25, 2023
0
Tags