Abdul Sattar : शेतकऱ्यांच्या (Farmers) उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध आणि समाधानी होईल यासाठीच कृषी विभागानं आपल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी दिले. यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा असंही ते म्हणाले. पुण्यातील कृषी आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत सत्तार बोलत होते.

राज्यातील चारही कृषी विद्यापिठांनी संशोधन करुन बियाणे निर्माण करावीत

शेतकऱ्यांना जी बियाणे पुरवण्यात येणार आहेत, त्याबद्दलही जागरुक राहावं. उत्तमातील उत्तम बियाणे कसे मिळतील यादृष्टीने कार्यवाही करावी असे मंत्री सत्तार म्हणाले. राज्यातील चारही कृषी विद्यापिठांनी सातत्याने संशोधन करुन बियाणे निर्माण करावीत. खासगी बियाणे उत्पादक यांच्यासोबत बियाणांच्या बाबतीत निकोप स्पर्धा झाली तर निश्चितच त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. तसेच आपल्या उत्तम संशोधनाचे कृषी विद्यापिठांनी योग्य ते मार्केटिंग करावे. अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचवावी असे सत्तार म्हणाले.

बोगस बियाणे उत्पादकांवर कडक कारवाई करावी

शासनाच्या तसेच विद्यापिठाच्या अखत्यारीतील जमिनीवरही कृषी विभागामार्फत शेतीचे नवनवीन प्रयोग राबवून त्याची माहिती राज्याच्या सर्व भागातील शेतकऱ्यांना द्यावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणांचा पुरवठा होईल याकडे लक्ष द्यावे तसेच बोगस बियाणे उत्पादकांवर कडक कारवाई करावी असे निर्देशही मंत्री सत्ता यांनी बैठकीत दिले. यावेळी राज्याचे कृषि सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, स्मार्टचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगांवकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या उभारणीचा आढावा

निविष्ठा आणि गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानासंदर्भात माहिती दिली. अन्नधान्य पिके खरीप हंगाम 2023 राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीनसह इतर पिकांची उत्पादकता वाढ आणि मूल्यसाखळी विकास येाजना या योजनांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगांवकर यांनीही प्रकल्पाबाबत माहिती दिली. तसेच बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीबाबतचा आढावाही सत्तार यांनी घेतला. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध आणि समाधानी होईल यासाठी कृषी विभागानं कालबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचनाही मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

कृषी विषयाचा शालेय शिक्षण अभ्यासक्रमात समावेश होणार; कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

from maharashtra https://ift.tt/n6ikJR9
Abdul Sattar : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभागानं सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, मंत्री सत्तारांचे निर्देश
April 25, 2023
0
Tags