Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

हसन मुश्रीफांसह त्यांची तिन्ही मुलं आणि सीएच्या अटकपूर्व जामीनावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पुर्ण झाला असून ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह आपला युक्तिवाद कोर्टात सादर करतील. ईडीनं सर्वांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे.

आशिष शेलार यांची पत्रकार परिषद

मुंबई - मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद... मुंबई भाजपा कार्यालय, वसंत स्मृती, दादर येथे पत्रकार परिषदेच आयोजन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर आज सुनावणी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकरता मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. वारंवार आंदोलनं करूनही सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे

मुंबई : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील जी-20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची पहिली बैठक आजपासून सुरु होत आहे. येत्या 28 ते 30 मार्च दरम्यान ही बैठक मुंबईत पार पडणार आहे. या तीन दिवसीय बैठकीत जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला गती देण्याविषयक चर्चेत, जी-20 सदस्य गटांचे शंभरहून अधिक प्रतिनिधी, निमंत्रित देशांचे प्रतिनिधी, प्रादेशिक समूहांचे तसेच आंतरराष्ट्रीय संस्थाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सकाळी 10 वाजता हॉटेल ताज लँड अँड वांद्रे येथे कार्यक्रम होणार आहे.

पुणे : भारत आणि आफ्रिकन देशातील संयुक्त लष्करी सरावादरम्यान आयोजित परिषदेला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3 वाजता पुण्यातील सिंबायोसिस शिक्षण संस्थेत आयोजित फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ व्याख्यानमालेत राजनाथसिंह यांचे व्याख्यान संध्याकाळी 4 वाजता होणार.

उमेश पाल अपहरण केसमध्ये स्पेशल कोर्ट आज निकाल देणार

प्रयागराज – उमेश पाल अपहरण केसमध्ये स्पेशल कोर्ट आज निकाल देणार आहे. माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्यासह इतर आरोपी आहेत. आतिकला काल गुजरातच्या साबरमती जेलमधून प्रयागराजला आणलं गेलय. सकाळी 11 वाजता त्यांना कोर्टात हजर करतील.

भाजपच्या संसदिय बोर्डाची आज बैठक

दिल्ली : भाजपच्या संसदिय बोर्डाची आज सकाळी 9.30 वाजता बैठक. संसद भवन लायब्ररी बिल्डींगमध्ये बैठकीच आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर भाजपचे खासदार बैठकीला उपस्थित रहातील

दिल्ली : संसदेत अदाणी प्रकरणावरून गोंधळ सुरू आहे. विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांची सदस्यता रद्द केल्यानंतर सुरू केलेलं आदोंलन सुरू आहे.

दिल्ली : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आज दिल्लीच्या लाल किल्यापासून टाऊन हॉलपर्यंत मशाल मोर्चाच आयोजन करण्याची तयारी सुरूय. या मोर्चाच नेतृत्व प्रियंका गांधी करू शकतात.

from maharashtra https://ift.tt/oFzn6rb
Maharashtra News Updates 28th March 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
March 27, 2023
0
Tags