Ads Area

28 March In History : कॉन्स्टँटिनोपलचे नाव बदललं, कपिल देवचा बळींचा विक्रम कोर्टनी वॉल्शने मोडला; आज इतिहासात

On This Day In History : 28 मार्चचा दिवस क्रीडा जगतासाठी दोन मोठ्या घटनांशी संबंधित आहे. आजच्याच दिवशी कपिल देव यांचा कसोटी क्रिकेटमध्ये 434 बळींचा विक्रम मोडला गेला, तर सायना नेहवाल बॅडमिंटनमधील जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाची खेळाडू बनली. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने 28 मार्च 2000 रोजी झिम्बाब्वे विरुद्ध सबिना पार्क येथे खेळलेल्या सामन्यात 435 वी विकेट काढली आणि कपिल देवचा 434 कसोटी बळींचा विक्रम मोडला. सायना नेहवालने 28 मार्च 2015 रोजी इंडिया ओपन स्पर्धेत जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत जगातील नंबर वन खेळाडू होण्याचा मान मिळवला.

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 28 मार्च या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांची मालिका पुढीलप्रमाणे आहे,

1930 : ऐतिहासिक कॉन्स्टँटिनोपलचे नाव बदलून इस्तंबूल ठेवलं

रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन द ग्रेट याने 328 मध्ये बायझँटियम या प्राचीन शहराचा विस्तार करून कॉन्स्टँटिनोपल (Constantinople) या शहराची स्थापना केली होती. हे 11 मे 330 AD रोजी नवीन रोमन साम्राज्याची राजधानी म्हणून सुरू झाले. रोमसारखे हे शहर सात टेकड्यांमधील त्रिकोणी पर्वतीय द्वीपकल्पात वसलेले आहे आणि पश्चिमेकडील भाग वगळता जवळपास सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. रम सागर आणि काळा समुद्र यांच्यामध्ये असलेल्या प्रमुख जलमार्गावर असल्याने या शहराचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. युरोपला आशियाशी जोडणाऱ्या एकमेव भूमार्गावर वसलेले असल्याने ते सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे होते.

मुस्तफा केमाल अतातुर्क (Mustafa Kemal Atatürk) म्हणजेच केमाल पाशाने (Mustafa Kemal Pasha) तुर्कस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांना युरोपच्या धर्तीवर आधुनिकीकरणाची सुरुवात केली. 28 मार्च 1930 रोजी राजधानी अंगोराचं नाव बदलून अंकारी असं करण्यात आलं, आणि कॉन्स्टँटिनोपलचे नाव बदलून इस्तंबूल (Istanbul) असं करण्यात आलं.

2000: कपिल देव यांचा सर्वाधिक बळीचा विक्रम मोडला

वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने (Courtney Walsh) 28 मार्च 2000 रोजी झिम्बाब्वे विरुद्ध सबिना पार्क येथे खेळलेल्या सामन्यात 435 वी विकेट काढली आणि कपिल देवचा  (Kapil Dev) सर्वाधिक 434 कसोटी बळींचा विक्रम मोडला.

8 फेब्रुवारी 1994 रोजी कपिल देवनेरिचर्ड हॅडलीचा 431 बळींचा विश्वविक्रम मोडला होता. 8 फेब्रुवारी 1994  रोजी अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात होता. त्या दिवशी कपिल देवला एक अतिशय खास विक्रम नोंदवण्याची संधी होती. हसन तिलकरत्नेला शॉर्ट लेगवर संजय मांजरेकरवी झेलबाद करून कपिल देवने इतिहास रचला.

2005: इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर शक्तिशाली भूकंपामुळे प्रचंड विध्वंस

2006: अमेरिकेने पाकिस्तानातील पेशावर येथील वाणिज्य दूतावास बंद केला.

2007: अमेरिकन सिनेटने इराकमधून सैन्य मागे घेण्यास मान्यता दिली.

2011: देशात वाघांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली. ताज्या जनगणनेनंतर, 2006 च्या 1411 च्या तुलनेत ती 1706 पर्यंत वाढली.

2015: सायना नेहवाल जगातील नंबर वन महिला बॅडमिंटनपटू बनली.

सायना नेहवालने 28 मार्च 2015 रोजी इंडिया ओपन स्पर्धा जिंकली आणि जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत जगातील नंबर वन खेळाडू होण्याचा मान मिळवला. सायनाने चिनच्या खेळाडूला मागे सारत ही कामगिरी केली होती.

from maharashtra https://ift.tt/lvaNWxk

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area