Pune Bypoll Election : पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप (BJP) उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. दरम्यान, आज मतदार कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत आहे तर कसबामध्ये दुहेरी लढत होत आहे. कसबा मतदार संघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतात तेथून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवतायेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नेते भाजपच्या उमेदावाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. तर महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज पाटील आदी नेत्यांनी प्रचारात जोर लावला होता. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या. त्यामुळे मतदार कोणाला कौल देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

कसबामध्ये पावने तीन लाख तर चिंचवडमध्ये साडेपाच लाखाहून अधिक मतदार

270 मतदान केंद्रांवर कसबा मतदारसंघातून दोन लाख 75 हजार 428 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर चिंचवडमध्ये या मतदार संघामध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून 510 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. दरम्यान, आज पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटले, रविंद्र धंगेकरांचा आरोप

भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला. याला विरोध म्हणून धंगेकरांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना कारवाईच आश्वासन दिलं, त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस बाकी असताना पुण्यात मागील पैशांचा पाऊस पडत आहे. हे सगळं पोलिसांसमोर घडत आहे. या सगळ्या प्रकारावर पोलीस दुर्लक्ष करत आहे. त्यामुळं लोकशाहीची हत्या होऊ नये यासाठी हे आंदोलन केलं होतं असं धंगेकरांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/LrUzBXl Dhangekar : भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप; आज कसबा गणपतीसमोर उपोषण करणार

from maharashtra https://ift.tt/90iZ4dx
Pune Bypoll Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
February 25, 2023
0
Tags