<p>औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अखेर केंद्र सरकारचीही मंजुरी मिळाली. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयाला आता केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यामुळं औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावं आता अधिकृतरित्या बदलणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नव्वदच्या दशकापासून या नामांतराचा आग्रह धरला होता. दरम्यान आता नामांतराचं श्रेय दोन्ही पक्षांकडून घेतलं जातंय </p>
from maharashtra https://ift.tt/XM7bN6W
Amol Mitkari on Rename : नामांतराचा आनंद, भाजपने आसुरी आनंद घेऊ नये : अमोल मिटकरी
February 24, 2023
0
Tags