Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह साजरा होतं आहे. राज्यभरात अनेक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरात बाईट रॅली, पारंपारीक वेषभुषेत शिवजयंतीच्या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं आहे. शिवनेरीवरही शिवजयंतीचा महोत्सव साजरा होणार आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवसन्मानाचा पाळणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोजावणार आहेत. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि नेते उपस्थित राहणार. सकाळी 9.30 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार. यावेळी राज्यभरातून अनेक शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल होतील.

पुणे - केंद्रिय गृहमंत्री अमित शाह पुणे आणि कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर बनलेल्या आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आंबेगावच्या शिवसृष्टीचं लोकार्पण अमित शाहांच्या हस्ते केल जाईल. सकाळी 11 वाजता अमित शाहांच्या हस्ते उद्घाटन होईल. अमित शाह पुण्यातून बायरोड आंबेगावला जातील.. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असती.

अमोल कोल्हे भगवा झेंडा खांद्यावर घेत “भगाव जाणीव आंदोलन” करणार

शिवनेरी : किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज फडकलाच पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे भगवा झेंडा खांद्यावर घेत “भगाव जाणीव आंदोलन” करत आहेत. सकाळी 7.30 वाजता शिवनेरीच्या पायथ्याशी जमून तिथून ते गडावर जाणार आहेत.

आग्रा किल्ल्यावर दिवाण-ए-आममध्ये छ्त्रपती शिवाजी महाराजयांची जयंती साजरी होणार

आग्रा – आग्रा किल्ल्यावर दिवाण-ए-आममध्ये छ्त्रपती शिवाजी महाराजयांची जयंती साजरी होणार आहे. विनोद पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठाण आणि आर आर पाटील फाऊंडेशनच्या वतीनं आयोजीत करण्यात आलेल्या शिवजयंती महोत्सवासाठी हजारोशिवप्रेमी जमनार आहे. या खास कार्यक्रमासाठी औरंगाबादहून कार्यकर्त्यांची स्पेशल ट्रेन रवाना झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची जोरदार तयारी आग्रा किल्ल्यात सुरु झाली असून या वेळी आकर्षक फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येणार आहे. आग्रा येथील शिवजयंती महोत्सव सोहळा डिजिटल स्वरुपात दाखवण्यात येणार असून सुमारे एक कोटी शिवभक्त त्यात सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांच्या वतीन करण्यात आलाय.

उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली

मुंबई - उद्धव ठाकरेंनी बोलावली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेनेच्या खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक. मोतोश्रीवर आज दुपारी होणार बैठक. पक्षचिन्ह आणि नाव गेल्यानंतर ठाकरे गटाची पुढची भूमिका ही तळागाळात पोहोचवण्यासाठी कोकण मधील महत्त्वाचे नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी बोलवलं आहे. ठाकरे गटाचे महत्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांना यावेळी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज कोल्हापुरात जोरदार स्वागत होणार

कोल्हापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज कोल्हापुरात जोरदार स्वागत होणार आहे. चिन्ह आणि नाव मिळाल्याने शिंदे गटाच्या वतीनं जोरदार स्वागत केल जाणार आहे. गंगावेसमध्ये यावेळी मोठा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित रहाणार असून शिवसैनिकांच्या वतीनं मोठ्या सोहळ्याच आयोजन केलय.

राज ठाकरे यांची आज मुलाखत

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या पूर्वनियोजित मुलाखती व कार्यक्रम - सकाळी 11.00 वा. माटुंगा व्हीजेटीआय काॅलेज येथे मुलाखत. त्यानंतर सायंकाळी 4.30 वा. रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी- पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या पत्नीच्या पुस्तकाचे प्रकाशन.

समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल मुंबई दौऱ्यावर

कल्याण - समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. कल्याणमध्ये सकाळी 11 वाजता पत्रकारांशी ते बोलती. मशाल चिन्हावर समता पक्षाची भविष्यातील रणनीती ते जाहीर करणार असून सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. यावेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहेत.

तेजस्वी सुर्या पिंपरी चिंचवडमध्ये प्रचाराला येणार

पिंपरी चिंचवड - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक प्रचार. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या दुपारी 12 वाजता, तर पंकजा मुंडे सायंकाळी 5 वाजता प्रचारासाठी उपस्थितर रहाणार आहेत.

मुंबईत ठिकठिकणी शिवजयंती साजरी केली जाणार

मुंबई - मुंबईत ठिकठिकणी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस शिवाजी पार्क परिसरातील अश्वारूढ पुतळ्याला सकाळी 9 वाजता पुष्पहार अर्पण करतील. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती असणार आहे. सोबतच मुंबई आणि मुंबई उपनगराच्या पालकमंत्र्यांची देखील उपस्थिती असेल.

उद्धव ठाकरे साधणार उत्तर भारतीय समाजासोबत संवाद

मुंबई – उद्धव ठाकरे साधणार उत्तर भारतीय समाजासोबत संवाद साधणार आहेत. सलग दुसऱ्या आठवड्यात उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. पालिका निवडणुकीत उत्तर भारतीय व्होट बँक आपल्या बाजूने वळविण्यासाठी सेनेने कंबर कसली. मागील आठवड्यातही लावली होती उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला हजेरी. आज दुपारी 4.30 वाजता चटवाणी हॉल, अंधेरी पुर्वला साधणार संवाद.

from maharashtra https://ift.tt/GNf2SwZ
Maharashtra News Updates 19 February 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
February 18, 2023
0
Tags