Ads Area

काँग्रेसच्या नव्हे तर पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री शाहांच्या कारकिर्दीत राहुल यांनी काश्मीरमध्ये तिरंगा फडकावलाय; फडणवीसांचा टोला

Deputy CM Fadnavis on Rahul Hoisted Tricolor in Kashmir: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 29 जानेवारी रोजी काश्मीरमधील ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवला. या मुद्द्यावरुन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधींवर पुण्यात बोलताना टीका केली आहे. ते म्हणाले की, "राहुल गांधींनी काश्मीरमध्ये (Kashmir) जाऊन तिरंगा फडकवला. काँग्रेसच्या (Congress) राजवटीत ते हे करू शकले नाहीत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कलम 370 रद्द केल्यामुळेच ते शक्य झालं." दरम्यान, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता करताना काश्मिरमध्ये तिरंगा फडकावला होता. याच मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

पीएम मोदींनी 1992 मध्ये लाल चौकात तिरंगा फडकावला

"26 जानेवारी 1992 रोजी तत्कालीन भाजप अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकावला होता. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि मुरली मनोहर जोशी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत एकता पदयात्रा काढली होती. ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवून हा प्रवास संपणार होता. तेव्हा नरेंद्र मोदी भाजपचे सरचिटणीस होते आणि नरेंद्र मोदींसोबत एकत्र मुरली मनोहर यांनी लाल चौकात तिरंगा फडकावला होता.", असं फडणवीस म्हणाले.

5 महिन्यांच्या दौऱ्यानंतर राहुल गांधींनी लाल चौकात तिरंगा फडकवला

काँग्रेसच्या वतीनं भारज जोडो यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेचा पहिला टप्पा काही दिवसांपूर्वीच पार पडला. तब्बल पाच महिने सुरू असलेल्या या यात्रेनं देशातील विविध राज्यांमधून प्रवास केला. पाच महिन्यांच्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लाल चौकात तिरंगा फडकवला. 7 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झालेली भारत जोडो यात्रा कन्याकुमारीहून निघाली आणि 5 महिन्यांनंतर 30 जानेवारी रोजी श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरमध्ये या यात्रेची सांगता झाली. यात्रेच्या समारोपाच्या एक दिवस आधी म्हणजे 29 जानेवारीला राहुल गांधींनी लाल चौकात तिरंगा फडकावला.

तिरंगा फडकवल्यानंतर राहुल यांनी देशातील जनतेला दिलेलं वचन पूर्ण करण्याबाबतचं ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, "लाल चौकात तिरंगा फडकवून, भारताला दिलेलं वचन आज पूर्ण झालं." यासोबतच त्यांनी पुढे लिहिलं की, "द्वेष हरेल, प्रेम नेहमीच जिंकेल, भारतात आशेची नवी पहाट होईल."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अमित शाहांचा ठाकरेंना टोला; शिंदेंना शिवसेना, धनुष्यबाण मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

from maharashtra https://ift.tt/joAYkHq

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area