Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान झालय. त्याचा निकाल आज लागणार आहे. यात तीन शिक्षक तर दोन पद्वीधर मतदार संघाचा समावेश आहे. पाचही ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. शिवाय सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्वतंत्र दोन बैठका होणार आहेत.

विधान परिषद मतमोजणी (Legislative Council Counting )

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान झालय. त्याचा निकाल आज लागणार आहे. यात तीन शिक्षक तर दोन पद्वीधर मतदार संघाचा समावेश आहे. पाचही ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. मतदान प्रक्रिया मतपत्रिकेवर पार पडल्यामुळे निकाल दुपारनंतर येणं अपेक्षित आहे.

सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सर्वात अगोदर पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील. त्यानंतर उमेदवारांची पहिल्या पसंतीची मते मोजली जातील. त्यानंतर वैध आणि अवैध मतमोजली जातील. त्यानंतर वैध मतांच्या आधारावर विजयासाठीचा कोटा ठरवला जाईल. पहिल्या पसंती क्रमांकात कोणताही उमेदवार जिंकला नाही तर दुसऱ्या पसंतीची मतमोजली जातील. ही निवडणुक प्रक्रिया पसंती क्रमांकानुसार पार पडली असल्यामुळे दुसरा आणि गरज लागल्यास तिसरा पसंती क्रमांक मोजला जाईल.

सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या बैठका

सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्वतंत्र दोन बैठका होणार आहेत. शिंदे गटाची सकाळी 11 वाजता तर भाजपची संध्याकाळी 7 वाजता बैठक होणार आहे. शिंदे गटाच्या बैठकीला सर्व आमदार मंत्री, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता वाटूर येथे श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला ते उपस्थित रहातील.

विरोधी पक्ष नेते अजित पवार आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर

विरोधी पक्ष नेते अजित पवार आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीबाबत अजित पवार भुमिका स्पष्ट करतील.

मनसे नेते अमित ठाकरे सांगली दौऱ्यावर

मनसे नेते अमित ठाकरे आज सांगली, तासगाव, विटा भागात दौरा करणार आहेत. विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता विटा येथे डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या तालमीला भेट देणार आहेत.

आमदार बच्चू कडू सोलापूर दौऱ्यावर

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. सोलापुरात दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

'कृषीगंगा' या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला सुरुवात

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आजपासून 'कृषीगंगा' या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे, सकाळी 10 वाजता. माजी मंत्री हसन मुश्रीफ, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातील भीम आर्मीच्या याचिकेवर सुनावणी

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान करून शाहु-फुले आणि आंबेडकरांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्याविरोधात अँट्रोसिटी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करत भीम आर्मीनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

from maharashtra https://ift.tt/si84ZmP
Maharashtra News Updates 02 February 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
February 01, 2023
0
Tags