Ads Area

Maharashtra MLC Election Results 2023 Live: विधान परिषदेची मतमोजणी, सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात, उमेदवारांची धाकधूक वाढली

मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचे निकाल आज. सर्व उमेदवारांची धाकधूक वाढली. सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात होणार आहे. राज्यातील नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा निकाल काही तासांवर आहे. पण, त्यातल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काय होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.

नाशकात गुलाल कुणाचा?

काँग्रेसनं डॉक्टर सुधीर तांबेंना उमेदवारी दिली तर भाजपनं कुणालाचा अधिकृत उमेदवारी दिली नाही. जेव्हा अर्ज दाखल झाले तेव्हा नाशिकतली रगंत आणखी वाढली. काँग्रसेचा एबी फॉर्म असतानाही सुधीर तांबेंनी अर्ज भरला नाही.तर त्यांचे पुत्र सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज भरला. तिकडे काँग्रेसनं तांबे पितापुत्रांचा निलंबनं केलं आणि भाजपच्या बंडखोर शुभांगी पाटलांनी मातोश्री गाठलं.  पुढे त्यांना मविआनं अधिकृत उमेदवारी दिला आणि नाशिकची  निवडणूक अधिक प्रतिष्ठेची बनली.

विक्रम काळे पुन्हा 'विक्रम' करणार?

राज्यातील नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तर चर्चेत होतीच. त्याचबरोबर औरंगाबादच्या निवडणुकीकडेही लक्ष होतं. कारण, भाजपनं नवख्या किरण पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पहिल्यांदा निवडणूक लढवणारे किरण पाटील यांच्यासमोर विक्रम काळेंचं तगडं आव्हान उभं होतं आणि म्हणून औरंगाबादच्या निवडणुकीचा चर्चा रंगली..

रणजीत पाटील पुन्हा गुलाल उधळणार?

अमरावतीत भाजपचे रणजीत पाटील हे तिसऱ्यादा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात मविआचे धीरज लिंगाडे उभे आहेत. तर तिकडे नागपुरात 22 उमेदवार रिंगणात आहे. पण, इथं चौरंगी लढत रंगली. काँग्रेसकडून सुधाकर आडबाले,  भाजप समर्पित विद्यमान आमदार नागो गाणार,
शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे,  राष्ट्रवादीचे बंडखोर म्हणून सतीश इटकेलवार मैदानात आहेत. त्यामुळे इथं कुणाचा गुलाल उधळणार.. हे अवघ्या काही तासांमध्ये कळेल...

कोकणातही थेट फाईट

कोकण शिक्षक मतदारसंघात मविआचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत आहे. त्यामुळे याठिकाणी होतंय, याकडेही लक्ष असेल. जागा पाच आहे पण, त्यांना विधिमंडळात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पाचही जागांवर आपला उमेदवार जिंकावा. यासाठी दोन्ही आघाड्यांवर प्रयत्न झाले. तशा प्रचारसभा झाल्याआणि आता नेमकं यश कुणाला मिळणार आहे. याकडे सत्ताधाऱ्यासह विरोधकांचं लक्ष लागलंय

from maharashtra https://ift.tt/G9NZkbn

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area