Ads Area

Sujay Vikhe-Patil : जनतेच्या प्रेमामुळंच मी राजकारणात, वाचा नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील

Sujay Vikhe-Patil : मला जनतेच्या प्रेमामुळं राजकारणात यावं लागलं. डॉक्टर या नात्यानं मी माझा व्यवसाय चांगला करत होतो असे मत भाजपचे (BJP) खसादर सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांनी व्यक्त केलं. मला आजही वाटतं मी राजकारणात नसताना समाजाला चांगलं दिशा देण्याचे काम करू शकतो. मात्र, जनतेने दिलेली जबाबदारी पार पाडावी लागते असे विखे पाटील म्हणाले. जबाबदारी पार पाडत पडत आज प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा संदेश कुणीतरी पुढे घेऊन जावं लागणार आहे. मी एक माध्यम म्हणून तो संदेश पुढे घेऊन जात असल्याचे विखे पाटील म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. यावर बोलताना राजकारणाची पातळी घसरल चाललेली आहे, त्याच्यावर कुठेतरी निर्बंध प्रत्येक पक्षांनी केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत असल्याचे विखे पाटील म्हणाले. ते दोघेही नेते खूप मोठे आहेत. त्यांच्यावर मी भाष्य करणं उचित नाही. प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यांनी जपून बोललं पाहिजे असं सुजय विखे पाटील म्हणाले.

काँग्रेस भूमिका मांडू शकत नाही

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर ते ठाम असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. यावर काँग्रेस किंवा शिवसेना यांनी आपली भूमिका मांडली नाही. यावर बोलताना खासदार विखे म्हणाले की, काँग्रेस भूमिका कधी मांडू शकत नव्हती. शिवसेनेकडे दोन आमदार राहिलेत. त्यामुळं त्यांच्या वक्तव्याचा काही विषयच राहिला नाही. विरोधी पक्ष नेत्यांना त्यांच्या भूमिकेवर ठाम राहावं वाटत असेल तर आम्ही त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केल्याचे विखे पाटील म्हणाले. आता ते जर म्हणत असतील की त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत तर निश्चित जेवढे शिवभक्त असतील ते त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये देतील असेही ते म्हणाले.

फिल्म इंडस्ट्री कोणी कुठेही पळून घेऊन जात नाही

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन चित्रपट क्षेत्रातील कलाकारांशी बैठक केली. यावरुन फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशमध्ये जाईल या चर्चेला उधाण आले आहे. यावर बोलताना खासदार विखे पाटील म्हणाले की, फिल्म इंडस्ट्री कोणी कुठेही पळून घेऊन जात नाही. अनेक चित्रपट निर्माते बाहेरच्या देशात जाऊन शूटिंग करतात मग काय ते तिकडेच स्थायिक होत नाहीत. एखादा स्टुडिओ दुसऱ्या राज्यात उघडत असेल तर तिथे चित्रपटाचे शूटिंग करून ते कलाकार पुन्हा मुंबईत येतील त्यांची घरे मुंबईत आहेत. शेवटी त्यांनी केलेल्या व्यवसायातून सरकारला मिळालेलं उत्पन्न हे  केंद्राच्या जीएसटीच्या माध्यमातून सरकारलाच मिळणार आहे. महाविकास आघाडीला कुठलेही काम नसल्यामुळे ते असे मुद्दे पुढे आणत असल्याचे विखे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

राज्यात पोपटवाल्यांची संख्या वाढली; राधाकृष्ण विखे पाटील यांचा जयंत पाटील यांना टोला

from maharashtra https://ift.tt/hFygduL

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area