Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

काँग्रेस नेते विश्वजीत कदम कार्यवाह असलेल्या भारती विद्यापीठाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे उद्घाटन आज शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सक्खु देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत, दुपारी 2 वाजता, भारतीय विद्यापीठ.

प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर घेणार राज ठाकरे यांची मुलाखत

पुणे – 18 व्या जागतिक मराठी परिषदेत आज राज ठाकरेंची मुलाखत प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर घेणार आहेत, सकाळी 11 वाजता. सम्मेलनाच्या समारोपाला चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार उपस्थित रहाणार आहेत.

अशोक सराफ यांचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार होणार

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार होणार आहे, संध्याकाळी 5.30 वाजता, यशवंत नाट्यगृह.

अंधेरीतील चंद्रशेखर सहनिवास या सोसायटीचा पुनर्विकास होणार

मुंबई – अंधेरीतील चंद्रशेखर सहनिवास या सोसायटीचा पुनर्विकास होणार आहे. चंद्रशेखर सहनिवासमध्ये घालवलेले क्षण, अनेक वर्ष सोबत केलेल्या सोसायटीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोसायटीतील रहिवाशी एकत्र जमणार आहेत. यावेळी पोलीस बँडच्या सादरीकरणातून सोसायटीला अखेरची मानवंदना दिली जाणार आहे, संध्याकाळी 7 ते 8.30 वाजताच्या दरम्यान हा कार्ययक्रम होणार आहे.

मुंबई – मुंबई पोलीस दलाच्या वतीने पोलीस ढाल आमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या अमृत महोत्सवी समारंभाचा पारितोषिक वितरण सोहळा पद्मश्री दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते होणार आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित राहणार आहेत, संध्याकाळी 6 वाजता, मरीन ड्राईव्ह, पोलीस जिमखाना.

अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा

कोल्हापूर – विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. ट्रॉमा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण समारंभ होणार आहे. चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आणि शेतकरी मेळावा होणार आहे, सकाळी 11 वाजता. गडहिंग्लज तालुक्याचे माजी सभापती अमर चव्हाण यांचे वडील रामचंद्र चव्हाण यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार आहेत, दुपारी 4 वाजता.

सर्वपक्षीय मिरज शहर बंदचे आवाहन, ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 लोकांवर गुन्हा दाखल

सांगली – आज सर्वपक्षीय मिरज शहर बंदचे आवाहन करण्यात आलंय. मिरजेत बस स्थानकाजवळील जागा ताब्यात घेण्यावरून त्या जागेवरील इमारत, गाळे पाडल्याचा निषेध म्हणून सर्व व्यापाऱ्यांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आलय. आज यात मोर्चा किंवा निदर्शने करण्यात येणार नसून केवळ व्यवहार बंद करण्याचे आवाहन करण्यात आलंय. या तोडफोड प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधु ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 लोकांवर मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय.

केसरी कुस्ती स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद

पुणे – 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद होणार आहे, सकाळी 11 वाजता, कै.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी, कोथरूड.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात वंजारी विद्यार्थी परिसंवादाचे आयोजन

नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात वंजारी विद्यार्थी परिसंवादाचे आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाला केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत, सकाळी 9.30 वाजता.

खंडोबा देवस्थानचा तीन दिवसीय वार्षिक यात्रोत्सवाचा आज मुख्य दिवस

अहमदनगर – पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा तीन दिवसीय वार्षिक यात्रोत्सवाचा आज मुख्य दिवस आहे. खंडोबा देवाच्या पालख्यांची मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत मानाच्या काठ्या हे आकर्षण असते.

आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी गोलमेज परिषद

जालना – आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी गोलमेज परिषद होणार आहे. या परिषदेत मराठा समाजाला त्यांच्या हक्काच्या कायमस्वरुपी टिकणाऱ्या आरक्षणासाठी राज्यातील विविध संघटना, अभ्यासक आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर दिशा ठरवणार, महापुरुषांच्या अवमाना प्रकरणी भूमिका जाहीर केली जाणार, सकाळी 10.30 वाजता.

अखिल भारतीय गझल संमेलनाचा आज समारोप

अकोला – अखिल भारतीय गझल संमेलनाचा आज समारोप होणार आहे. दुपारी 4.30 वाजता संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षीय भाषणानं संमेलनाचा समारोप होईल. त्यानंतर गझलनवाज भिमराव पांचाळे यांची गझल मैफिल होईल.

वरोरा येथे 41 किलोमीटरच्या मॅरेथॉनचं आयोजन

चंद्रपूर – माता महाकाली बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने आज वरोरा येथे 41 किलोमीटरच्या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे . आनंदवन चौक ते पडोली अशी ही मॅरेथॉन राज्यस्तरीय असून या मध्ये संपूर्ण राज्यातून शेकडो स्पर्धक सहभागी होणार आहे, सकाळी 6 वाजता.

from maharashtra https://ift.tt/zA0dcIo
Maharashtra News Updates 8th January 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
January 07, 2023
0
Tags