Sindhudurg News : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी अशा शब्दात कवी सुरेश भट यांनी मराठी भाषेचं गोडवा मांडला आहे. अशाच गोड मराठी भाषेचा लळा चिमुकल्या परदेशी पाहुण्याला लागला आहे. रशियातून (Russia) भारतात पर्यटनासाठी आलेलं रशियन कुटुंब (Russian Family) पृथ्वीवरच्या स्वर्गात अर्थात तळकोकणात पर्यटनासाठी फिरत होते. त्यावेळी त्यांचा 11 वर्षांचा मिरॉन ॲलेगेविज लुकेशिवी (Miron Alegewij Lukeshivi) हा जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रेमात पडला आणि त्याच शाळेत तो मराठी भाषेचे धडे गिरवतोय.

Sindhudurg school : आजगावमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मिरॉन घेतोय शिक्षण

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर लुकेशिवी कुटुंबीय भारतात आले आहे. भारतात ते पर्यटनासाठी विविध ठिकाणी फिरु लागले. गोव्यात काही दिवस वास्तव्य करून हे लुकेशिवी कुटुंब सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथे थांबलं आहे. मळेवाड ते शिरोडा येथे समुद्र पर्यटनासाठी जात असताना आपल्या अकरा वर्षाच्या मुलाचे शिक्षण सुरू ठेवाव, यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत याला प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मात्र, त्यांच्या मुलांचं मन कुठल्याही शाळेत रमत नव्हतं. मात्र, शिरोडवरुन जाताना रस्त्यालगत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आजगावमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा रंगरंगोटी केलेल्या परिसराची त्याला ओढ निर्माण होऊ लागली. त्यामुळं मिरॉनने चक्क प्राथमिक शाळेत मराठी भाषेचे धडे गिरवण्यास सुरुवात केली आहे.

Marathi School : काही दिवसातच मिरॉन मराठी भाषा बोलायला शिकला

एकीकडं महाराष्ट्रात मराठी शाळेत आपल्या मुलांना न शिकवता इंग्रजी माध्यमातून शिकवण्यासाठी भर दिला जात आहे. मात्र, रशियामध्ये इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या 11 वर्षाच्या मुलाचं मन चक्क जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रमलं आहे. अल्पावधीतच त्याने मराठीतील काही शब्द, गणिती अंक आत्मसात केले आहेत. मिरॉनचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असूनही मराठी शाळेत शिकण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. काही दिवसातच मिरॉन मराठी भाषा बोलायला शिकला आहे. तो वर्ग मित्रांसोबत खेळतो आणि जेवणाच्या पंगतीचा आनंदही घेतो. शाळेतील पोषण आहार आवडीने खातो.

कोकणी भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थावर प्रेम

सहा महिन्यासाठी आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून मिरॉन रशियाहून आला होता. आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून फिरताना आजगावच्या या शाळेनं मात्र त्याला आकर्षित केले. त्यानं आई-वडिलांकडे शाळेत प्रवेश करून देण्याचा हट्ट धरला. आता त्या शाळेत अल्पावधीतच मिरॉन मुलांबरोबर चक्क मराठीमध्ये शिक्षण घेत आहे. त्यासोबत वर्गातील मित्रांबरोबर खेळांमध्ये रमतो आहे. विशेष म्हणजे मित्रांबरोबर संवाद साधताना भाषेचा कोणताही अडसर त्याला जाणवत नाही. मराठीतले काही शब्द तसेच अंक तो लिहणं बोलणंही शिकत आहे. कोकणी भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थ यावरही तो प्रेम करू लागला आहे.

वर्गातील मुलां-मुलींसोबत मिरॉनची घट्ट मैत्री

मिरॉनने स्वतःला पाहुणा विद्यार्थी म्हणून कोणतीही विशेष वागणूक न देण्याची विनंती शिक्षकांना केली आहे. शाळेतील सर्व शिक्षक सुद्धा त्याच्या समरसतेचे कौतुक करतात. त्याला आवडीनं शिकवतात. त्याने आपल्या वर्गातील मुलां-मुलींसोबत चांगली घट्ट मैत्री जमवली आहे. मिरॉनच्या शाळेतील वातावरण अतिशय सुंदर असून शाळेतील शिक्षक, विद्यार्थी अतिशय मनमिळाऊ आहेत. मिरॉनला शाळा आवडली असून तो रोज आवडीने शाळेत जातो. रशियातील आणि भारतातील शिक्षणात फरक असला तरी मिरॉन इथे मराठी भाषेत शिक्षण घेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

...तर 2027 पर्यंत मुंबईत एकही मराठी शाळा नसणार; भाजप आमदार अमित साटम यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

from maharashtra https://ift.tt/BK6D5WT
Sindhudurg News : पर्यटक म्हणून आला अन् मराठी शाळेत रमला, रशियाचा चिमुकला जिल्हा परिषदेच्या शाळेत गिरवतोय मराठीचे धडे
January 27, 2023
0
Tags