Ads Area

Headlines 29 January: लिंगायत समाजाचा आज मुंबईत महामोर्चा, पंतप्रधान मोदी आज मंत्रिमंडळाची बैठक घेणार; आज दिवसभरात

Headlines 29 January : अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने आजपर्यंत राज्यभर 22 महामोर्चे झाले. गेल्या आठवडयात राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. सर्व मागण्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले तरी समितीने लेखी उत्तर मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवण्यास नकार दिला, त्यामुळे मुंबईत आज महामोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता आझाद मैदानातून राज्यव्यापी लिंगायत महामोर्चाला सुरुवात होईल.

हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा

मुंबई- लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेलं आहे, अशा काही पिडीताही सहभागी होणार आहेत. सकाळी 10 वाजता या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होईल. अनेक भाजपचे नेते सुद्धा या मोर्चाला हजेरी लावणार आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान मोदी आज मंत्रिमंडळाची बैठक घेणार

दिल्ली- 31 जानेवारीला होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान मोदी आज मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. 2023 या नव्या वर्षातील ही पहिली बैठक आहे. मोदींच्या अध्यक्षतेतील या बैठकीत केंद्र सरकारमधील सर्व केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री सहभागी असतील. सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार

दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आज मन की बात कार्यक्रमाचा 97 वा भाग प्रसारित होईल.

दिल्लीच्या विजय चौकात आज बीटिंग रिट्रीट सोहळा

दिल्ली- राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या विजय चौकात आज बीटिंग रिट्रीट सोहळा होणार आहे. यंदाच्या बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात शास्त्रीय रागांवर आधारीत भारतीय धुन वापरल्या जाणार आहेत. तर या सोहळ्यात भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन शोचाही समावेश असणार आहे. 3,500 ड्रोनचा त्यात सहभाग असेल. संध्याकाळी 5.15 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर

औरंगाबाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. दुपारी 2 वाजता निरंकारी संत समागम कार्यक्रमास लावणार उपस्थिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी पुणे आणि मावळ दौऱ्यावर

पुणे, पिंपरी-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी पुणे आणि मावळ दौऱ्यावर आहे. संध्याकाळी 5.45 वाजता 16 व्या भीमथडी जत्रा आणि प्रदर्शनाला उपस्थिती तर संध्याकाळी 7 वाजता भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराज मंदिरातील माघ दशमीच्या सोहळ्याला लावणार उपस्थिती.

अजित पवार आज सातारा दौऱ्यावर

सातारा-  विरोधी पक्षनेते अजित पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. सकाळी 9 वाजता अजित दादांच्या हस्ते वडूजमधील स्पंधन हॉस्पिटलचे उद्घाटन, 11 वाजता क्रां. इंदूमती पाटणकर यांच्या पहिल्या टप्याचे उदघाटन समारंभ, दुपारी 2 वाजता धामणेर येथील प्रशासकीय इमारतीचे उदघाटन.

दग्रस्त डॉक्युमेंट्रीच्या विरोधात ब्रिटेनमध्ये भारतीय समुदायाचे लोक बीबीसीच्या मुख्यालयासमोर आंदोलन करणार

लंडन- बीबीसीच्या वादग्रस्त डॉक्युमेंट्रीच्या विरोधात ब्रिटेनमध्ये भारतीय समुदायाचे लोक बीबीसीच्या मुख्यालयासमोर आज आंदोलन करणार आहेत. संध्याकाळी 5.30 वाजता

आयसीसीच्या अंडर 19 महिला टी 20 वल्डकपची आज फायनल

दक्षिण आफ्रिका- भारत वि. इग्लंड दरम्यान आज आयसीसीच्या अंडर 19 महिला टी 20 वल्डकपची आज फायनल. संध्याकाळी 5.15 वाजता

from maharashtra https://ift.tt/hzPC4rU

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area