Political News : तेलंगणा (Telangana) राज्याचे मुख्यमंत्री KCR अर्थात कुलवकुंथाला चंद्रशेखर राव यांच्या TRS (तेलंगणा राष्ट्र समिती) या पक्षाचे नाव बदलून त्यांनी (BRS) भारत राष्ट्र समिती हे नाव केलंय. दरम्यान TRS हा पक्ष फक्त राज्य स्तरावर न राहता त्याचे राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल सुरू करण्यासाठी TRS चे नाव बदलून BRS अथवा भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले.

तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून पक्ष वाढ कारण्यासठी सज्ज
BRS पक्षाचे राष्ट्रीय पक्ष म्हणून विस्तारीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री केसीआर यांनी कंबर कसली असून या अगोदर कर्नाटक राज्यात बैठका आणि सभांचे सत्र सुरू केले. तर तेलंगणा राष्ट्र समिती अथवा BRS पार्टी महाराष्ट्रात आपल्या पक्षाची वाटचाल सुरू करण्यासाठी पहिली जाहीर सभा नांदेड येथे घेणार आहे. दरम्यान यासाठी BRS पक्षा कडून आज सभेचे स्थान निश्चित करण्यासाठी स्थळ पाहणी करण्यात आलीय. या महिन्याकच्या सात तारखेनंतर पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर राव हे नांदेड येथील पवित्र श्री हुजूर साहब सचखंड गुरुद्वाऱ्याचे दर्शन घेतील, यानंतर BRS पक्षाच्या महाराष्ट्रातील वाटचालीची सुरुवात करतील.

महाराष्ट्रात 'या' भागात बैठका
महाराष्ट्रात 7 जानेवारी अगोदर नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा सीमावर्ती भाग असणाऱ्या किनवट, माहूर, बिलोली, देगलुर, धर्माबाद या तालुक्यातील गावांमध्ये पक्ष कार्यकर्ते आमदार हे बैठका घेतील तर 7 जानेवारी नंतर KCR यांची पहिली जाहीर सभा नांदेडात पार पडेल. महाराष्ट्रात BRS पक्षाचे अध्यक्ष KCR यांच्या या महिन्यात नांदेड, शिवनेरी किल्ला, परभणी आणि औरंगाबाद अशा चार सभा होणार आहेत. पहिली सभा नांदेड येथे पार पडल्यानंतर दुसरी जाहीर सभा ही थेट शिवनेरी किल्यावर होणार असल्याची माहिती BRS पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ता माणिक कदम यांनी दिली आहे.

इतर बातम्या

Eknath Khadse: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गौण खनिज घोटाळा प्रकरणातील आरोप फेटाळून लावले आहेत.

from maharashtra https://ift.tt/CMR9cHi
Political News : भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात चार सभा घेणार, BRS पक्षाची पहिली जाहीर सभा नांदेड मध्ये
January 02, 2023
0
Tags