Ads Area

BJP MISSION: महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदारसंघांवर भाजपचं लक्ष, कोणत्या मंत्र्यांकडे कोणते मतदारसंघ?

BJP MISSION: 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अवघे  सोळा महिने शिल्लक राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात भाजपची जय्यत तयारी सुरू असून  लोकसभेत परत एकदा स्वबळावर सत्ता आणण्यासाठी एक वर्षापूर्वीपासून भाजपचे 'मिशन 144' ( Bjp Mission 144 ) काम सुरु झाले. या मिशन 144 अंतर्गत देशातील 144 असे लोकसभा मतदारसंघ निवडले गेले ज्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दुसऱ्या क्रमांकावर राहत पराभवाचा सामना करावा लागला, किंवा असे लोकसभा मतदारसंघ जिथे स्थानिक आघाडीमुळे भाजप आजवर निवडणूक लढली नाही अशा मतदारसंघांची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातल्या 18 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

महाराष्ट्रातल्या या 18 लोकसभा मतदारसंघ भाजपच लक्ष?

दक्षिण मध्य मुंबई, मध्य मुंबई, पालघर, कल्याण, चंद्रपूर, हिंगोली, म्हाडा, बुलढाणा, धाराशिव औरंगाबाद, शिरूर, शिर्डी, बारामती, सातारा, हातकणंगले, कोल्हापूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड

चार लोकसभा मतदारसंघ मिळून एक क्लस्टर तयार करण्यात आले

18 लोकसभा  मतदारसंघासाठी महाराष्ट्रात पाच क्लस्टर पाच  करण्यात आले

पाच केंद्रीय मंत्र्यांवर पाच क्लस्टरची जबाबदारी देण्यात आली.

कोणत्या मंत्र्यांकडे कोणते मतदारसंघ?

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे दक्षिण मध्य मुंबई, मध्य मुंबई, पालघर, कल्याण हे चार लोकसभा मतदारसंघ देण्यात आले

केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे शिरूर, शिर्डी, बारामती आणि रायगड या चार लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी देण्यात आली

केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांच्याकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा, म्हाडा व धाराशिव या चार लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी देण्यात आली

तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे हातकणंगले व कोल्हापूर या दोन लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी देण्यात आली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या 18 लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्प सभांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात झाली. यात 2019 च्या लोकसभेमध्ये भाजपचा पराभव झालेले लोकसभा मतदारसंघ आणि  उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाच्या गटात असलेले लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मिशन अंतर्गत  लोकसभा  मतदारसंघात पक्षाची बांधणी मजबूत करणे, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संपर्क साधने, त्यांची शिबिरं घेणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा प्रचार प्रसार करणे हे कार्य प्रामुख्याने पुढची एक वर्ष चालणार आहे.  विजय संकल्प सभेअंतर्गत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्येक क्लस्टर मध्ये एक सभा तर  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस या  प्रमुख नेत्यांच्या प्रत्येक लोकसभा  मतदार संघात एक सभा यानुसार भारतीय जनता पक्षाने मिशन संकल्प सभांचे नियोजन केले आहे.

प्रत्येक क्लस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा होणार आहे. राज्यात पाच क्लस्टर तयार करण्यात आले त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच सभा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे  राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक लोकसभा संघात प्रत्येकी एक एक सभा होणार आहे. 2024 लोकसभा निवडणुकीपर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम चालणार आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीला घेऊन भाजप अत्यंत गांभीर्यपूर्वक नियोजन करत असून प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस व इतर प्रादेशिक पक्ष यांनी सध्या तरी लोकसभा निवडणुकीवर काम सुरू केल्याचे तूर्तास दिसत नाही. या तयारीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला किती यश मिळेल हे सध्या तरी सांगता येणार नाही.

from maharashtra https://ift.tt/zkRNsVy

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area