<a href="https://ift.tt/qEklDz0 144 in Mumbai : मुंबईत (Mumbai) पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. ही जमावबंदी (Prohibition) 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर रोजी रात्रीपर्यंत लागू असेल. पोलीस (Mumbai Police) सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार काही कारणाने कायदा आणि सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. जमावबंदी (Prohibition) असेल मात्र संचारबंदी (No Curfew) नसेल. पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत मुंबई शहरात कलम 144 लागू केलं आहे. या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही. याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या मिशन विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितलं की, मुंबई शहरात 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत लाऊडस्पीकर, मिरवणूक आणि मेळावे घेण्यास बंदी आहे.

कलम 144 अंतर्गत 'या'वर बंदी

पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई आहे.

मिरवणुकांवर बंदी असेल.

फटाके फोडण्यास मनाई आहे.

लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी.

मिरवणुकीत बॅण्डला मनाई आहे.

परवानगीशिवाय सामाजिक मेळावे करण्यास मनाई आहे.

आंदोलने/उपोषणास मनाई आहे.

जमावबंदी म्हणजे काय?

जमावबंदी आदेश म्हणजे पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचे एकत्र येण्यास बंदी. जमावबंदीच्या आदेशामध्ये खासगी, सार्वजनिक ठिकाणांचा समावेश होतो. जमावबंदीचे आदेशही फौजदारी दंड संहितेच्या 144 कलमान्वये जारी केले जातात. कायदा आणि सुव्यवस्था उद्भवण्याची परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, एखादा अपघात किंवा नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचेल अशा कृतीला आळा घालण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केला जातो.

दरम्यान, नागरिकांनी लक्षात घ्यावं की, मुंबईत शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे, संचारबंदी नाही. जमावबंदी आणि संचारबंदी यामध्ये फरक आहे. संचारबंदीमध्ये लोकांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध लागू केले जातात. ह्या काळात लोकांवर घरात राहण्याची कायदेशीर सक्ती असते. तर, जमावबंदी आदेशादरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडण्यावर निर्बंध नसतात, केवळ पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यावर निर्बंध असतात.

from maharashtra https://ift.tt/er4WjYq
Mumbai : मुंबईत आजपासून जमावबंदी, 15 दिवसांसाठी आदेश लागू
December 02, 2022
0
Tags