Ads Area

Maharashtra Kesari 2022 : महाराष्ट्र केसरी 11 ते 15 जानेवारीदरम्यान पुण्यातच होणार

<p>अखेर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वादावर तोडगा काढण्यात आलाय. शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटना भारतीय कुस्ती संघाने बरखास्त केली होती. त्यानंतर भाजपचे खासदार असलेले रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नवी कार्यकारिणी नेमण्यात आली होती. या वर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आपणच भरवणार असल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून करण्यात आला होता. बाळासाहेब लांडगे यांनी डिसेंबर महिन्यात अहमदनगरमधे तर रामदास तडस गटाकडून जानेवारीत महिन्यात पुण्यात ही स्पर्धा होईल असं जाहीर करण्यात आलं होतं.त्यामुळे नक्की कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हायच यावरून पैलवानांमधे संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर शरद पवार आणि बृजभूषण सिंग यांनी तोडगा काढलाय. यानुसार खासदार रामदास तडस अध्यक्ष आणि काका पवार कार्याध्यक्ष असतील. तर शरद पवार मुख्य सल्लागार आणि बाळासाहेब लांडगे सल्लागार म्हणून काम पाहतील. त्यामुळे, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ११ ते १५ जानेवारीदरम्यान पुण्यात होण्याचा मार्ग मोकळा झालाय.</p> <p>&nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/5SAXCwK

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area