Ads Area

5 December Headline : गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान, शिवशक्ती- भीमशक्तीची बैठक; आज दिवसभरात

Todays 5 December Top Headline : गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी आज मतदान करणार आहेत. याबरोबरच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पहिली बैठक होणार आहे. तर अधिवेशनात मांडायच्या महत्वाच्या मुद्द्यांवर आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. हे. त्याशिवाय अनेक महत्वाच्या घडामोडी आज दिवसभरात घडणार आहे. वाचा आज दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडींबद्दल

गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान

गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी आज मतदान करणार आहेत.

पंतप्रदान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचं उद्घाटन करतील आणि बैठकीला संबोधित करतील.

जी 20 समिटसाठी  केंद्र सरकारची सर्व पक्षीय बैठक
जी 20 समिटसाठी आज केंद्र सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे.  राष्ट्रपती भवन कल्चरल सेंटर येथे संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होईल. संसदेत प्रतिनिधित्व असणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांना या बैठकीला बोलावण्यात आलं आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका शस्त्रक्रियेमुळे या बैठकीला हजर राहू शकणार नाहित.

आज शिवशक्ती- भीमशक्तीची पहिली बैठक
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पहिली बैठक आज होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक
अधिवेशनात मांडायच्या महत्वाच्या मुद्द्यांवर आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  19 तारखेला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या शेतकरी मोर्चाबाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे.

उदय सामंत जत दौऱ्यावर

उद्योगमंत्री उदय सामंत जत तालुक्यातील सीमावर्ती भागाचा दौरा करुन या भागात सुरु असलेल्या घडामोडी व समस्यांचा आढावा घेणार आहेत.

धनगर आरक्षणावर बैठक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाबाबत तातडीची बैठक बोलवली आहे. धनगर ऐक्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत उपमुख्यमत्र्यांसोबत बैठक होणार आहे.

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर
जी 20 समिटच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची देशभरातील सर्वपक्षीय महत्वाच्या नेत्यांसोबत आज बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत सहभागी होणार आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात पुण्यात धरणे आंदोलन
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात पुणे शहरातील विरोधी पक्षाचे  सगळे माजी महापौर धरणे आंदोलन करणार आहेत.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची पत्रकार परिषद
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे.

नंदूरबारमध्ये बिरसा फायटर संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

तळोदा येथे बोगस आदिवासींना राज्य सरकार संरक्षण देत असल्याचा आरोप करत बिरसा फायटर संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

from maharashtra https://ift.tt/ORyjheH

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area