मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेविरोधात घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीकडून सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. भंडाऱ्यात ते दोनशे कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमीपूजन करतील. दुपारी 3.30 वाजता खातरोड रेल्वे मैदान, माधवनगर येथे त्यांची जाहीर सभा होईल. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत.

जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेविरोधात घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीकडून आंदोलन

जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेविरोधात घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीकडून सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाणार आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा कळमनुरी, हिंगोली येथून सुरू होणार
काँग्रेसची भारत जोडो यात्रा कळमनुरी, हिंगोली येथून सुरू होणार आहे. सकाळी सहा वाजता यात्रेला सुरुवात होईल.

मुख्यमंत्री भंडारा जिल्हा दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. भंडाऱ्यात ते दोनशे कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमीपूजन करतील. दुपारी 3.30 वाजता खातरोड रेल्वे मैदान, माधवनगर येथे त्यांची जाहीर सभा होईल.

भंडारऱ्यात शेतकरी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार

आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे धान केंद्र सुरू न केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध करण्यासाठी त्यांना काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू करेमोरे यांनी दिला आहे.

काँग्रेस आज गुजरात निवडणुकीसाठी घोषणापत्र जाहीर करणार

काँग्रेस आज गुजरात निवडणुकीसाठी घोषणापत्र जाहीर करणार आहे. सकाळी 11.30 वाजता घोषणा पत्र जाहीर केले जाईल.

अजित पवार पुण्यातील विविध कार्यक्रमात सहभागी होणार

विरोधी पक्षनेते अजित पवार पुण्यातील विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांची पत्रकार परिषद

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांची दुपारी साडे तीन वाजता पुण्यात पत्रकार परिषद होणार आहे.

सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात गुगवाड येथे 'धम्मभूमी' लोकार्पण सोहळा

सांगली- दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यात धम्मभूमी. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बुद्ध विहार आणि धम्मभूमी. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात गुगवाड येथे 'धम्मभूमी' लोकार्पण सोहळा आहे. वीस एकर क्षेत्रामध्ये बुद्ध विहार, भिकू ट्रेनिंग सेंटर, लायब्ररी, यूपीएससी एमपीएससी ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर दौऱ्यावर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांची जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी भेट आणि चर्चाही आहे. दुपारी 12 वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे.

from maharashtra https://ift.tt/qTYjpP5
Todays Headline : जितेंद्र आव्हाडांच्या अटकेविरोधात राष्ट्रवादीकडून आंदोलन, मुख्यमंत्री भंडारा दौऱ्यावर; आज दिवसभरात
November 11, 2022
0
Tags