<p style="text-align: justify;"><strong>Raigad Bus Accident :</strong> माणगाव ते किल्ले रायगड रस्त्यावर सहलीवरुन परत येणाऱ्या बसला अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. ही बस सुमारे 10 ते 15 फूट खाली कोसळली आहे. यामध्ये 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ते प्रवासी किल्ले रायगडावर गेले होते. परतत असताना बसला हा अपघात झाला आहे. हे प्रवासी पुण्यातील निगडीचे असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमींवर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत.</p> <p style="text-align: justify;">सर्व प्रवासी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घ्यायला आले होते. आज सायंकाळच्या सुमारास परतीच्या मार्गावर असताना किल्ले रायगड ते निजामपूर मार्गावरील घरोशीवाडीनजीक या बसचा अपघात झाला. यावेळी, अवघड वळणावर बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याखाली सुमारे 10 ते 15 फूट कोसळली. यामुळं या अपघातात बसमधील 10 प्रवासी जखमी झाले असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. </p>
from maharashtra https://ift.tt/otfgF8I
Raigad Accident : सहलीवरुन परत येणाऱ्या बसचा माणगाव - रायगड रस्त्यावर अपघात, 10 प्रवासी जखमी
November 11, 2022
0
Tags