<p>वाराणसीमधील काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याचा निर्णय सरकारनं घेतला... त्यासाठी विकास आराखडाही आखलाय... या विकास आराखड्याला स्थानिकांनी जोरदार विरोध केलाय... मात्र सरकार हा विरोधानंतरही तो आराखडा राबवण्यावर ठाम दिसतंय.... कारण चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या ऐतिहासिक होळकर आणि शिंदे वाड्याच्या कामाच्या नोटिसा राजघराण्याच्या संस्थानिकांना बजावण्यात आल्या आहेत. दीड हजार कोटीच्या कामासाठी कन्सल्टिंग एजन्सीची नेमणूक करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं कळतेय... परंतु या आराखड्यामुळे मंदिर परिसरातले जे रहिवाशी बाधित होत आहे त्यांच्यासाठी मात्र राज्य सरकारने नेमकी किती आर्थिक मदत करणार त्यांचं पुनर्वसन कसं करणार याबद्दलचा खुलासा केलेला नाही आणि त्यामुळे संभ्रम वाढलेला आहे</p>
from maharashtra https://ift.tt/XxtOLc7
Pandharpur Development plan पंढरपुरातील ऐतिहासिक वाड्याला नोटीस, सरकार विकास आराखडा राबवण्यावर ठाम
November 28, 2022
0
Tags