Agriculture News in Hingoli : सध्या राज्यात थंडीचा कडाका (cold weather) वाढला आहे. वाढत्या थंडीमुळं लोकांनी जागोजागी शेकोट्या पेटवल्या आहेत. दरम्यान, या वाढत्या थंडीचा शेती पिकांना देखील फटका बसत असल्याचे दिसत आहे. वाढत्या थंडीमुळं हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक (Banana Crop) शेतकरी चिंतेत आहेत. कारण, थंडीमुळं केळीच्या वजनात घट येत असून, केळीची वाढही कमी होत आहे. यामुळं केळीच्या उत्पन्नात तब्बल 30 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

वाढत्या थंडीमुळं केळीचं वजन घटलं

राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुलं राज्यात हुडहुडी वाढली आहे. यावर्षी वाढत्या थंडीचा परिणाम केळीच्या बागांवर होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात थंडी वाढल्यानं केळीचं वजन आणि वाढ घटत आहे. त्याचबरोबर थंडी वाढल्यानं विक्रीसाठी तयार असलेल्या कच्च्या केळीच्या सालीच्या पेशी मृत पावतात, त्यामुळं बाजारात केलीला योग्य दर मिळत नाही. परिणामी याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

मराठवाड्यात यावर्षी थंडीचा जोर अधिक

यावर्षी मराठवाड्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. याचा फटका शेतकी पिकांना बसत आहे. विशेषत: केळीच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. थंडी वाढल्याने केळीच्या फळाची वाढ होत नाही. त्यामुळं केळीच्या वजनात मोठ्या प्रमाणात घट होते. त्याचबरोबर विक्रीसाठी तयार असलेल्या सालींच्या पेशी मृत पावतात त्यामुळं पिकल्यानंतर केळी पिवळा दिसत नाही. परिणामी या केळीला बाजारात चांगला दर मिळत नाही. त्यामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतं. या थंडीमध्ये केळीच्या उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

केळीसाठी 20 ते 38 या दरम्यान तापमानाची गरज

वाढत्या थंडीमुळं केळीची योग्य प्रकारे वाढ होत नाही. केळीची फणी बाहेर व्यवस्थित येत नाही. अशा स्थितीत केळीची लांबी कमी असते, तसेच फण्यातील अंतरही कमी होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. वाढत्या थंडीमुळं केळीला पिवळा गर्द कलर येत नाही. त्यामुळं मार्केटमध्ये असा केळीला मागणी नसते, याचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. केळीला तापमान हे 20 ते 38 या दरम्यान पाहिजे. यापेक्षा तापमानाचा पारा खाली गेला तर त्याचा केळी पिकाला फटका बसत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. वजनात जून जुलैच्या लागवडीपेक्षा जवळपास 30 टक्क्यांपर्यंतची घट होऊ शकते अशी माहितीही शेतकऱ्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/inaA2Ip News : एकीकडं कडाक्याची थंडी तर दुसरीकडं वन्य प्राण्यांचा धोका, शेतीसाठी रात्रीचा वीज पुरवठा केल्यानं शेतकऱ्यांचा मनस्ताप

from maharashtra https://ift.tt/ERVKLPo
Agriculture News : वाढत्या थंडीचा केळीच्या बागांना फटका, उत्पादनात घट होण्याची शक्यता, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत
November 28, 2022
0
Tags