Konkan Raliway Updates : मध्यरात्री इंजिनातील तांत्रिक बिघाडामुळे खोळंबलेली कोकणकन्या एक्सप्रेस अखेर मार्गस्थ झाली आहे. पण तरिही कोकण रेल्वेची (Konkan Railway News) वाहतूक विस्कळीतच आहे. मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेसच्या (Konkan Kanya Express) इंजिनात बिघाड झाल्यामुळे मध्यरात्रीपासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या. तसेच, कोकण रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेलापत्रकाचा फटका सर्वसामान्यांसह कोकण दौऱ्यावर निघालेल्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना बसला होता.

खोळंबलेली कोकणकन्या अखेर मार्गस्थ

कोकण रेल्वे (Konkan Raliway) मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कोकणकन्या एक्सप्रेसच्या (Konkan Kanya Express) इंजिनात बिघाड झाल्यानं तब्बल पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती. मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या. पण अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आलं. त्यानंतर कोकणकन्या एक्सप्रेस मार्गस्थ झाली. पण अद्यापही कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिरानंच सुरु आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

इंजिनात बिघाड झाल्यामुळं कोकण रेल्वेची वाहतूक मध्यरात्रीपासून विस्कळीत झाली होती. दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ही घटना घडली. परिणामी अनेक गाड्या विविध स्टेशनवरती खोळंबलेल्या होत्या. बिघाड झालेली रेल्वे मार्गस्थ होऊनही कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या दोन ते साडेतीन तास उशिरानं धावत आहेत. कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिरानं धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

तर दुसरीकडे इंजिनात बिघाड झाल्यानं कोकण रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाचा फटका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बसला आहे. चंद्रशेखर बावनकुळे कोकण कन्या एक्स्प्रेसनं प्रवास करत आहेत. कोकण कन्या गाडी जवळपास साडेतीन तास उशिरानं धावत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर असून आज ते रत्नागिरी जिल्ह्यात असणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/wFhqYJf Politics : भाजपचे लक्ष शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दोन दिवसीय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौरा

from maharashtra https://ift.tt/qpY50ge
Konkan Raliway Updates : इंजिनात बिघाड झालेली ट्रेन तब्बल पाच तासांनी मार्गस्थ, पण कोकण रेल्वेची वाहतूक अद्याप उशिरानंच
November 24, 2022
0
Tags