Kamakhya Temple Guwahati : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी व्हाया सुरत गुवाहाटी गाठलं होतं. तिथं जेव्हा त्यांच्या राज्य वापसीची वेळ आली, तेव्हा त्यांनी तिथल्या कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. सोबतीला सगळेच आमदारही होते. तेव्हा कामाख्या देवीला केलेला नवस फेडण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सगळ्याच आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह आज मुंबईहून गुवाहाटीला रवाना होणार आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुवाहाटी चांगलेच चर्चात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालेय. मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यात कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. त्याशिवाय आसामचे मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी काही महिने आधीपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती.

तीन महिन्यापूर्वी शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे आपल्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन आधी सुरतला आणि तिथून गुवाहाटी येथे मुक्कामी होते. गुवाहाटी येथे सर्वाधिक काळ त्यांचा मुक्काम होता. या काळात त्यांनी भारतातील एक प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन तिथे विशेष पूजा केली होती. आमचे प्रयत्न सफल होऊ देत असे साकडे देखील कामाख्या देवीला घालण्यात आले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री बनल्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे हे त्याच देवीच्या दर्शनाला जात आहेत.

पाहूयात कसा असेल मुख्यमंत्री यांचा गुवाहाटी दौरा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व मंत्री, आमदार आणि खासदारांसह आज गुवाहाटीच्या दौऱ्याला जाणार आहेत.
26 आणि 27 असा दोन दिवसीय हा दौरा आहे.
26 तारखेला सकाळी 26/11 च्या वीरांना आदरांजली वाहून मुख्यमंत्री सर्वांना घेऊन गुवाहाटीसाठी रवाना होणार आहेत.
एअर इंडिया कंपनीचे एक विशेष प्लेन त्यासाठी बुक करण्यात आले आहे.
आमदार खासदार त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी यांना घेऊन मुख्यमंत्र्यांसह हे विमान सकाळी साडेदहा वाजता मुंबईहून उड्डाण करेल.
दुपारी एक वाजेपर्यंत ते गुवाहाटी येथे उतरेल.
तिथून सर्वजण रेडिसन ब्ल्यू या हॉटेलवर जातील.
जवळपास संपूर्ण हॉटेलच बुक करण्यात आले आहे. याच हॉटेलमध्ये सत्तांतराच्या काळात देखील मुख्यमंत्री आणि आमदार वास्तव्यास होते.
त्यानंतर संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान कामाख्या देवीच्या दर्शनाला सर्वजण पोहोचतील.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिथे पूजा केली जाईल. त्यानंतर मंत्री आमदार खासदार देखील देवीचे दर्शन घेतील.
दर्शन झाल्यानंतर सर्वजण पुन्हा एकदा हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे येतील.
संध्याकाळी आसामचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भेट नियोजित आहे. यावेळी इतर महत्त्वाच्या व्यक्तींना देखील मुख्यमंत्री भेटण्याची शक्यता आहे.
26 तारखेला रात्री गुवाहाटी येथेच सर्वांचा मुक्काम असेल.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता विशेष विमान पुन्हा एकदा सर्वांना घेऊन उड्डाण करेल आणि एक वाजेपर्यंत मुंबईमध्ये दाखल होईल.

सहाजिकच मुख्यमंत्र्यांच्या या गुवाहाटी दौऱ्यावर विरोधकांनी आरोप देखील केले आहेत. स्वातंत्र्याच्या काळात मदत केलेल्या प्रत्येकाला मुख्यमंत्री स्वतः जाऊन भेटून त्यांचे आभार व्यक्त करता आहेत. तसेच कामाख्या देवीला घातलेले साकडे देखील ते पूर्ण करणार आहेत. पण आधीच ज्योतिषाला हात दाखवल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत असताना पुन्हा एकदा देव दर्शनाला संपूर्ण मंत्री आमदार आणि खासदारांना नेल्याने हा गुवाहाटी दौरा देखील वादग्रस्त होण्याची चिन्ह दिसत आहेत.

from maharashtra https://ift.tt/8HsE4UK
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह निघाले गुवाहाटीला, कामाख्या देवीचं नवस फेडणार
November 25, 2022
0
Tags