<p>शिवसेनेतल्या ठाकरे आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्याची लढाई संपली असलीय.. मात्र आता धनुष्यबाण या चिन्हासाठी दोन्ही गटातील राजकीय सामना केंद्रीय निवडणूक आयोगात रंगणार आहे... शिवसेना आणि शिंदे गटाला या संदर्भात कागदपत्रं सादर करण्यासाठी दिलेली मुदत संपलीय. दोन्ही गटांना आज निवडणूक आयोगासमोर कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्रं सादर करावी लागणार आहेत. त्यातच मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होतेय. त्यामुळे शिवसेनेतल्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचं काय होणार याची उत्सुकता वाढलीय.</p>
from maharashtra https://ift.tt/ZEBItyz
Shivsena Symbol : शिवसेनेच्या चिन्हाबाबतचा निर्णय आज येणार? कुणाला मिळणार धनुष्यबाण ABP Majha
October 06, 2022
0
Tags