<p>बातमी मराठी पाट्यांची. वारंवार मुदतवाढ देऊनही दुकानांवर मराठी नामफलक लावण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांवर सोमवारपासून कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. चौथ्यांदा दिलेली मुदतवाढ संपुष्टात आल्यानंतर महापालिका आता दुकानांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. पहिल्या टप्प्यात विभागवार दुकानांची पाहणी करण्यात येणार आहे. दुकानावर मराठी भाषेतील नामफलक नसल्यास संबंधित दुकानदाराला सात दिवसांची नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तरतुदीनुसार दुकानदारांवर प्रति कामगार दोन हजार रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो. तसेच न्यायालयीन खटलाही दाखल होऊ शकतो.</p>
from maharashtra https://ift.tt/iy9N7JC
Maharashtra : मुदत संपली! ठळक अक्षरात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर आता थेट कारवाई
October 06, 2022
0
Tags