ठाणे: ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माहुली गडावर (Mahuli Fort) रविवारी वाट चुकलेल्या सहा पर्यटकांचा शोध घेण्यात ग्रामस्थांना यश आले. ठाणे आणि ऐरोली येथील पर्यटक वाट चुकल्याने सायंकाळी माहुली गडावरच भरकटले होते. गडावरून खाली येण्याची वाट न सापडल्याने हे दोघे तेथेच अडकून पडले होते. अखेस सहा तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील माउंट एवरेस्ट समजला जाणाऱ्या किल्ले माहुली गडावर ट्रेकिंगसाठी ठाणे आणि ऐरोली येथून 11 पर्यटकांपैकी चार पर्यटक गडावर दिशादर्शक सूचनाफलक नसल्यामुळे वाट चुकल्याने सायंकाळी माहुली गडावरच भरकटले होते. वाट चुकल्यानंतर त्यांनी आडवाटेने गड उतरण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश होता. सदर घटनेची माहिती किल्ले माहुली गड प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पितांबरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जीवरक्षक रेस्क्यू टीम तसेच वनविभाग व स्थानिक पोलीस गडावर दाखल झाली. तब्बल सहा तास गडावर अडकून पडलेल्या पर्यटकांना सुखरूप गडाच्या पायथ्याशी घेऊन येण्यात यश आले.

संबंधित पर्यटकांकडून वनविभागाने प्रत्येकी 30 रुपये अशी 330 रुपये प्रवेश फी घेण्यात आली होती. प्रवेश फी घेतलेली असताना देखील वनविभागाची मदत का पोहचली नाही? प्रवेश फी घेऊन सुद्धा गडावर दिशादर्शक सूचना फलक का नाही? पर्यटकांना जर वेळेत वनविभागाची मदत मिळाली असती तर ते भटकले नसते शिवाय त्यांच्या जीवाचं काही बर वाईट झालं असतं तर त्याला जवाबदार कोण? असा सवाल किल्ले माहुली गड प्रतिष्ठान आणि शंभू दुर्ग प्रतिष्ठान कडून उपस्थित केला जातो आहे. वनविभागाने पर्यटकांच्या जीवनाशी खेळू नये अशी शिवभक्तांची मागणी असून गरजेच्या सोयी उपलब्ध करुन देण्यात यावी जेणेकरून अशी घटना पुन्हां घडणार नाही अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे.

from maharashtra https://ift.tt/0kTiJmg
Mahuli Fort: शहापूर- माहुली गडावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका, वनविभाग आणि स्थानिकांकडून अडकलेल्या पर्यटकांची सुटका
October 30, 2022
0
Tags