Shiv Sena Dasara Melava 2022 : सध्या दसरा मेळाव्यावरुन शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गटात (CM Eknath Shinde) चढाओढ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा कुणाचा? यावरुन शिंदे गट आणि शिवसेना यांच्या प्रतिष्ठेची लढाई रंगली आहे. अशातच शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेकडून 'चलो शिवतीर्थ' म्हणत दसरा मेळाव्यासंदर्भात बॅनरबाजी सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या बॅनर्सवरुन एकीकडे दसरा मेळाव्यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. तर दुसरीकडे दसरा मेळाव्याचं औचित्य साधत ठाकरे कुटुंब आपला हुकमी एक्का बाहेर काढणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

दादरमधल्या शिवाजी पार्कवर कोण दसरा मेळावा घेणार हे अद्याप ठरलेलं नसलं तरीही आता शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्ये तेजस ठाकरेंचा फोटो दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचाही फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचा मुहुर्त साधत तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे कुटुंब हुकमी एक्का काढणार?

शिवाजी पार्कच्या मैदानात दसरा मेळाव्यासाठी अद्याप पालिकेकडून कोणालाच परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच, शिवाजी पार्कचं मैदान दसरा मेळाव्यासाठी कोणालाही मिळणार नाही, अशी चर्चा सुरु झाल्या असून यासंदर्भातील महापालिकेचा विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय एबीपी माझाच्या हाती लागला आहे. अशातच शिवसेनेनं मात्र यासर्व घडामोडींवर आक्रमक पवित्रा घेत थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा घेण्याची तयारी दर्शवली आहे. तशी तयारीही शिवसेनेकडून सुरु झाल्याची चर्चा आहे. गद्दारांना क्षमा नाही...!, अशा आशयाचे बॅनर शिवसेनेकडून झळकवण्यात आले असून दसरा मेळाव्याच्या बॅनरवरील तेजस ठाकरेंच्या फोटोमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणं आलं आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे परिवार आपला हुकमी एक्का बाहेर काढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेकडून आरपारच्या लढाईची तयारी

शिवतीर्थावर नेमका कोणाचा दसरा मेळावा होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसताना आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान नाकारल्यास शिवसेना कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेनं निर्णय घेण्यास उशीर लावल्यास आणि हे प्रकरण आणखी ताणल्यास शिवसेना थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा करण्याच्या तयारीत आहे. शिवतीर्थावर नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार? यावर मुंबई महापालिका निर्णय घेणार आहे. मात्र शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी फक्त आणि फक्त शिवतीर्थ हा एकमेव पर्याय आहे. इतर कुठल्याही मैदानाचा विचार शिवसेना करणार नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कुणालाच मिळणार नाही? विधी विभागाचा अभिप्राय माझाच्या हाती

<a href="https://ift.tt/jGiQ3PO Uddhav Thackeray: मुंबईत शिवसेना गटप्रमुखांचा आज मेळावा; BMC निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार

from maharashtra https://ift.tt/cvmtHyN
Shiv Sena, Dasara Melava 2022 : तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री? दसरा मेळाव्याच्या बॅनरवरील फोटोमुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या
September 20, 2022
0
Tags