Ads Area

Buldhana Agriculture : बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळं आत्तापर्यंत सव्वा सहा हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान, तर 10 जणांचा मृत्यू

Buldhana Agriculture News : राज्याच्या विविध भागात चांगलाच पाऊस (Rain) कोसळत आहे. यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळं शेती पिकांचे तसेच शेत जमिनीचे मोठं नुकसान झालं आहे. बुलडाणा (Buldhana) जिल्ह्याला देखील या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसानं बुलडाणा जिल्ह्यातील सव्वा सहा हजार हेक्टरवरील शेतजमिनीचं नुकसान झालं आहे. तर 9 जणांचा वीज पडून मृत्यू झाला असून, एक जण बेपत्ता आहे. लहान मोठी 56 जनावरं दगावली आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी पडत असलेल्या संततधार पावसानं हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. जून महिन्यापासून आजपर्यंत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील 12 हजार 184 शेतकऱ्यांच्या सव्वा सहा हजार हेक्टर शेत जमिनीचं नुकसान झालं आहे. तर या नैसर्गिक आपत्तीमध्ये 10 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. ज्यामध्ये 9 जणांचा अंगावर वीज पडल्याने तर एकास पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. शिवाय या नैसर्गिक आपत्तीमध्ये 56 लहान-मोठी जनावरे देखील दगावली आहेत. यासंबंधीचा अहवाल बुलडाणा नैसर्गिक आपत्ती विभागानं शासनास पाठवला आहे.

बुलडाणा  जिल्ह्यात सरासरीच्या 33 टक्के अधिक पावसाची नोंद

बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या 33 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास सर्वच जलाशय तुडुंब भरले आहेत. सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पावसामुळं जिल्ह्यात अनेकदा वीज पडणे, पुरात वाहून जाणे अशा अनेक नैसर्गिक अपत्ती ओढवल्या आहेत. यात यावर्षी 10 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर शेतकऱ्यांचे सव्वा सहा हजार हेक्टर शेत जमिनीचं नुकसान झालं आहे. 56 लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू या नैसर्गिक आपत्तीत झाला आहे.

राज्यात अतिवृष्टीचा शेती पिकांना मोठा फटका

यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडला आहे. या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतात पाणी साचून राहिल्यानं पिकं वाया गेली आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. पशुधनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढच्या तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर असणार आहे. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/ZLqdFSi Rain : गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस, धरणातून पाण्याचा विसर्ग, शहरातील नागरिकांच्या घरात शिरलं पाणी

<a href="https://ift.tt/JlZHrsL Rain : आज विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

from maharashtra https://ift.tt/TKukP9E

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area